Sat, Feb 23, 2019 05:05होमपेज › Pune › पुणे महापालिका प्रशासनात बदल

पुणे महापालिका प्रशासनात बदल

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 08 2018 2:15AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या आयुक्‍तपदाचा पदभार सोडताना कुणाल कुमार यांनी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय बदल केले आहेत. अनेक वर्षे न्यायालयीन वादात अडकलेल्या पालिकेच्या चार अधिकार्‍यांना उपायुक्तपदी बढती देण्यात आली असून, इतर चार अधिकार्‍यांना सहाय्यक आयुक्‍तपदी बढती देण्यात आली आहे. 

उपायुक्‍तपदी बढती देण्यात आलेल्या अधिकार्‍यांमध्ये माधव देशपांडे, संध्या गागरे, उमेश माळी आणि वसंत पाटील या अधिकार्‍यांचा समावेश आहे, तर सहायक महापालिका आयुक्‍तपदी बढती देण्यात आलेल्या अधिकार्‍यांमध्ये वैभव कडलख, आशिष महादडळकर, संतोष तांदळे, सुनील झुंजार यांचा समावेश आहे. याशिवाय पथ विभागाचे प्रभारी प्रमुख राजेंद्र राऊत यांची बांधकाम विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांचा पदभार अधीक्षक अभियंता अनिरुध्द पावसकर यांच्याकडे देण्यात आला आहे. 

तर अधिक्षक अभियंता मदन आढारी, विजय शिंदे यांचीही पथ विभागात बदली करण्यात आली आहे. भवन रचना विभागाचे प्रमुख संदीप खांडवे यांच्याकडे मलनिसा:रण देखभाल दुरूस्तीचा पदभार देण्यात आला आहे. 

न्यायालयाच्या आदेशानंतरही या अधिकार्‍यांना पदोन्नत्ती दिली जात नसल्याने चार अधिकार्‍यांनी आयुक्तां विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर आयुक्तांनी बदली होऊन जाता-जाता या बढतीस मान्यता दिली. याशिवाय पालिकेकडून राबविल्या जाणार्‍या राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्प तसेच सार्वजनिक पार्किंग धोरणाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यासही आयुक्तांनी मान्यता दिली आहे.