Mon, Jun 17, 2019 02:14होमपेज › Pune › कायद्याची लढाई जिंकून भुजबळ बाहेर येतील : राज्यमंत्री कांबळे

कायद्याची लढाई जिंकून भुजबळ बाहेर येतील : राज्यमंत्री कांबळे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ बेहिशोबी मालमत्ता मिळविल्याच्या कारणावरून तरूंगात आहेत. भारतीय जनता पक्षांचे खासदार किरीट सोमय्या यांनी वारंवार भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. मात्र भाजपचेच राज्यमंत्री असलेले दिलीप कांबळे यांनी भुजबळ यांच्यावर स्तुती सुमने उधळत छगन भुजबळ हे गोरगरिबांसाठी लढणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यासारखा लढवय्या माणूस बाहेर असणे आवश्यक असून ते कायद्याची लढाई जिंकून लवकरच ते बाहेर येतील असे मत व्यक केले. दिलीप कांबळे यांनी भुजबळ यांचे कौतुक केल्याने उपस्थितांच्या भुवया  उंचालल्या. 

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातील फले वाड्यावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने मंगळवारी ‘समता पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ विचारवंत डॉ. मा. गो. माळी यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आला. यावेळी केंद्रीय मानव संसादन राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
या कार्यक्रमात सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये आणि भुजबळ समर्थकांच्या समोर छगन भुजबळ यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. भुजबळ यांच्याबद्दल बोलताना कांबळे फारच भावूक झाले. ’भुजबळ कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. पण, ज्या कलमाच्या आधारे त्यांना जामीन मिळत नव्हता, ते कलमच आता रद्द झाले आहे. त्यामुळे कायद्याची लढाई जिंकून भुजबळ लवकरच बाहेर येतील. त्यांना लवकरात लवकर जामीन मिळावा, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना करतो,’ असेही कांबळे म्हणाले.