Tue, Mar 19, 2019 09:48होमपेज › Pune › हल्ली जातीला खूपच कुरवाळल जातय : नाना पाटेकर 

हल्ली जातीला खूपच कुरवाळल जातय : नाना पाटेकर 

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 06 2018 12:50AMपुणे : प्रतिनिधी

कलावंताला जात नसते. कलावंत हा जातीच्या कोणत्याही भांड्याच्या साच्यात बसत नाही. त्याला भांड्यातल्या पाण्याप्रमाणे आपली भूमिका वेळो-वेळी बदलावी लागते. कधी रामोश्याची तर कधी सुताराची देखील भूमिका करावी लागते. आयुष्यात सुख आणि दु:खांप्रमाणे भूमिका बदलल्याशिवाय मला भूमिका करता येत नाही. परंतु, हल्ली क्षेत्र कोणतेही असो, त्यात मात्र, जातीला खूपच कुरवाळल जातय, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.

पस्तीस वर्षांच्या प्रशासकीय सेवेनंतर पुण्याचे विभागीय महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी (आय.ए.एस.) नुकतेच निवृत्त झाले. प्रशासकीय कार्यकाळात चंद्रकांत दळवी यांनी केलेल्या अजोड कार्याबद्दल चंद्रकांत दळवी यांच्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक येथील मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा कृतज्ञता गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ अभिनेते आणि नाम फौंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांच्या हस्ते निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकात दळवी यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, बी. व्ही. जी. ग्रुपचे हणमंतराव गायकवाड, आयएएस अधिकारी शेखर गायकवाड, पद्मा दळवी, संयोजन समितीचे सचिन ईटकर, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, दिलीप बंड, ज्योती लाटकर, धर्मेंद्र पवार व अन्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार सुनील जोशी यांनी केले. तर आभार सुनील चव्हाण यांनी मानले.

यावेळी नाना पाटेकर म्हणाले, माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात माझ प्रत्येकाशी भांडण आहे. आयुष्यात भांडणे सर्वांशी व्हायला हवीत नाहीतर जीवन नुसत आळणी होत. जीवनात नुसताच गोडपणा नसायला हवा कधी-कधी तिखटपणा असणे देखील चांगले असते. आजकाल अनेक राजकारण्यांबद्दल जनतेच्या मनात प्रचंड द्वेष आहे. ते ठिकठिकाणी राजकारण्यांच्या कार्यालयांच्या झालेल्या तोडफोडीवरून पाहायला मिळते. मात्र, जनतेने तोडफोड न करता भविष्यात त्या राजकारण्यांना निवडूनच देऊ नये. यावेळी कुलगुरू नितीन करमळकर म्हणाले, चंद्रकांत दळवी हे एक उमद व्यक्तीमत्व आहे. हे मी त्यांच्या ‘निढळ’ गावी गेल्यानंतर पाहिल. 

 

Tags : pune, pune news, Chandrakant Dalvi, Gratitude Honor Ceremony,