Mon, Jan 21, 2019 13:56होमपेज › Pune › पुणे : माजी महापौर चंचला कोद्रे यांचे निधन

पुणे : माजी महापौर चंचला कोद्रे यांचे निधन

Published On: Dec 18 2017 1:59PM | Last Updated: Dec 18 2017 1:59PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुण्याच्या माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका चंचला कोद्रे (वय 42) यांचे सोमवारी (दि. 18) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पती संदीप, मुलगा तेजस आणि मुलगी तन्वी असा परिवार आहे. उच्चशिक्षित, अभ्यासू महापौर आणि नगरसेविका अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सोमवारी सकाळी झोपतेच हृदयविकाराचा झटका आल्याने कोद्रे यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. रात्री साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर मुंढवा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

महापालिकेच्या 2012 च्या  निवडणुकीत मुंढवा भागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर त्या पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना महापौरपदाची संधी मिळाली. सप्टेंबर 2014 ते सप्टेंबर 2015 या कालावधीत त्यांनी पुण्याचे महापौरपद भूषविले. त्यानंतर 2017 च्या महापालिका निवडणुकीत त्या दुसर्‍यांदा निवडून आल्या होत्या.  कोद्रे यांचे सासरे कैलास कोद्रे 25 वर्षे नगरसेवक होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.