Tue, Apr 23, 2019 09:45होमपेज › Pune › मेट्रो स्थानकांच्या कामांना ‘वायरिंग’चे आव्हान

मेट्रो स्थानकांच्या कामांना ‘वायरिंग’चे आव्हान

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 1:02AMपुणे : प्रतिनिधी 

वनाज ते रामवाडी (रिच 2) या मेट्रो मार्गावर एकूण 16 मेट्रो स्थानकेआहेत. यापैकी काही स्थानके रस्त्याकडेला असणार आहेत. रस्त्याच्या बाजूने असणार्‍या अशा स्थानकांचे बांधकाम करतेवेळी लाईट, फोन व इतर अशा अनेक सुविधांच्या वायरिंगचे जाळे असल्यामुळे खोदकाम करताना  अडथळा होणाची शक्यता आहे. त्यामुळे येथील काम सुरू करण्यासाठी संबंधित कंपन्यांच्या एजन्सीजशी बोलणी करून मगच कामाला सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या इतर कामापेक्षा स्टेशनच्या कामाला वेळ होत आहे.  

मेट्रो पुलासाठीचे बांधकाम रस्त्यांच्या मधोमध  सुरू आहे. रस्त्याच्या मधे पाण्याच्या पाईपलाईन सोडल्या तर इतर कोणत्याही नागरी सुविधांचे जाळे कमी आहेत. मात्र रस्त्यांच्या कडेला जमिनीच्या खालून अनेक सुविधांसाठी वेगवेगळ्या वायरींग करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे रस्त्याच्या बाजूने ज्या काही मेट्रो स्थानकांची कामे होणार आहेत ती सुरू करण्यासाठी महामेट्रला काळजेपुर्वक काम करावे लागणार आहे. यासाठी अनेक परवानगीच्या प्रक्रिया पुर्ण कराव्या लागणार आहे. 

सध्या पौड रस्त्यावर मेट्रो मार्गाचे काम जोमाने सुरू आहे. या मार्गावर  वनाज, आयडियल कॅालनी आणि आनंद नगर या तीन ठिकाणी मेट्रोचे स्टेशन्स असणार आहेत. यापैकी आयडीयल कॅालनी आणि आनंद नगर येथील स्टेशनचे काम सुरू होणार आहे. यासाठी या रस्त्यावरील नागरी सुविधा असणार्‍या निगडित एजन्सिजला महामेट्रोकडून पत्रव्यवहार करण्यात येत आहे. त्यानंतर स्टेशन्सच्या कामाला वेग येणार आहे. सध्या आयडियल कॅालनी येथे स्टेशनच्या खांबांसाठीचे 9 फाउंडेशन तयार करण्यात आले आहे. महामेट्रो आणि महानगरपालिका यांची नुकतीच पौड रस्त्यावर पाहणी झाली आहे. या रस्त्यावर होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेता काम सुरू झाल्यापासून सहा महिन्यात फाउंडेशन पुर्ण होत आल्यावर बॅरिकेडिंग काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतुक कोंडी कमी होण्यास याचा फायदा होणार आहे. 

खडकी-रेंजहिल्स मार्गावर मेट्रो पुलास मान्यता

पुणे मेट्रोच्या स्वारगेट-पिंपरी मार्गातील रेंजहिल्स ते पिंपरी या पहिल्या टप्प्यातील दापोडी ते पिंपरी मार्गिकेचे काम वेगात सुरू आहे. तर खडकी, रेंजहिल्स येथील लोहमार्गावर पूल उभारणीस मध्य रेल्वेने मंजुरी दिली आहे. तसे पत्र नुकतेच महामेट्रोला प्राप्त झाले आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीची जागा देण्यास संरक्षण विभागाकडून मान्यता दिल्यानंतर हे काम सुरू केले जाणार आहे. 

मेट्रो मार्गात अडथळा होणारे वृक्ष कोणत्याही परिस्थितीत तोडले जाणार नाहीत तर, फक्त पुनर्रोपन करण्यात येणार आहे, असा निर्णय घेऊन सध्या वृक्षतोडीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यात आला आहे. महामेट्रोकडून वृक्षतोडीसाठी ठेवण्यात आलेला प्रस्ताव चुकीचा आणि अर्धवट असल्याचा आरोप राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी केला होता. महामेट्रोकडून महापालिकेकडे प्रकल्पाच्या कामात अडथळा ठरणारे सुमारे 1246 झाडे काढण्याचा प्रस्ताव मागील वर्षी देण्यात आला होता. मात्र, तो अद्यापही मंजूर झालेला नाही. महामेट्रोकडून अनेक वृक्ष तोडण्यात आले असून, काही वृक्षांचे पुनर्रोपन करण्यात आले असल्याचे महामेट्रोकडूनच सांगण्यात येत होते. मात्र पुढील काळात आता एकही वृक्ष तोडण्यात येणार नसल्याचे सूत्रांनी सांगेतले आहे.