Tue, Nov 20, 2018 19:00होमपेज › Pune › भारत बंदला केंद्र सरकार जबाबदारः प्रकाश आंबेडकर

भारत बंदला केंद्र सरकार जबाबदारः ॲड.आंबेडकर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात झालेल्या फेरबदलाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, एफआयआर नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करा, असा न्यायालयाचा एक निर्णय आहे. मात्र, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय या निर्णयाशी विसंगत आहे. भाजप नेत्यांकडून आरक्षण संपविण्याची चर्चा केली जात असल्याने अस्वस्थता वाढत आहे. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात भर पडली.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली तक्रार दाखल केल्यास प्रथम शहानिशा करून त्यात तथ्य आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. इतकेच नव्हे, तर अनुसूचित जाती- जमातींना क्रिमिलेयर लागू करू शकत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा पूर्वीचा निर्णय असतानाच आता पुन्हा न्यायालयाने याबाबत सरकारला भूमिका मांडण्याची नोटीस बजावली आहे. या विसंगत निर्णयांविरोधात सोशल मीडियावरून बंदची हाक दिली गेली आहे.

संघ मुक्‍तीची भाषा कधीच करत नाही, तर हे राजकारणात चालते, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत केले होते. त्याविषयी बोलताना आंबेडकर म्हणाले, खोटे बोलणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहासच आहे. मी निवडणुकीत उभा असताना संघाचे कार्यकर्ते एका हातात गुलाल आणि दुसर्‍या हतात नीळ घेऊन मतदारांना तुम्हाला काय हवे आहे, असा प्रचार करत होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत फरक असतो. 

Tags : Bharat Band, Center, Government, Supreme Court, Prakash Ambedkar, 


  •