Tue, Apr 23, 2019 02:23होमपेज › Pune › देहू, आळंदी, पंढरपूर तीर्थक्षेत्र सुधारणांसाठी केंद्राने निधी द्यावा : श्रीरंग बारणे 

देहू, आळंदी, पंढरपूर तीर्थक्षेत्र सुधारणांसाठी केंद्राने निधी द्यावा : श्रीरंग बारणे 

Published On: Aug 03 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 12:06AMपिंपरी : प्रतिनिधी

श्री क्षेत्र देहु, आळंदी व पंढरपूर या  तीर्थक्षेत्राच्या सुधारणांसाठी केंद्र सरकारने जास्त निधी द्यावा अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.

लोकसभेच्या ‘शून्य’ प्रहरात खा. बारणे यांनी ही मागणी केली. ते म्हणाले वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी विविध ठिकाणांहून भाविक दर्शनासाठी येतात. आषाढी व कार्तिक एकादशीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातून 10 ते 15 लाख वारकरी भाविक येतात. श्री क्षेत्र देहू येथून श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी व श्री क्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा निघतो.

महाराष्ट्र, कर्नाटकामधून जवळपास 200 हून अधिक पालख्या 20 ते 25 दिवस पायी चालत येतात. या पालख्या सोबत लाखोच्या संख्येने भाविक पंढरपूरला चालत दर्शनासाठी येत असतात पंढरपूर यात्रेदरम्यान यात्रेकरूंसाठी सुविधांचा अभाव आहे. यात्रेकरूंसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता, शौचालय व अन्य सुविधा त्यांना पुरविण्यासाठी मोठ्या आर्थिक निधीची आवश्यक्ता असल्याने श्री क्षेत्र देहू, आळंदी व पंढरपूर या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या वतीने जास्तीत जास्त आर्थिक निधी देण्यात यावा, अशी मागणी बारणे यांनी केली.