Tue, Sep 25, 2018 10:43होमपेज › Pune › नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर

नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 11 2018 10:42PM

बुकमार्क करा
पुणे :  प्रतिनिधी

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा 2017 मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थ्यांची मुलाखत 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. परीक्षार्थ्यांना त्यांचा निकाल  www.upsc.gov.in  या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. दरम्यान, परीक्षार्थ्यांना त्यांचे मुलाखतीचे प्रवेशपत्र 18 जानेवारीपासून डाउनलोड करता येणार आहे.