Wed, Jul 17, 2019 11:58होमपेज › Pune › केंद्राकडून दूध उद्योगाच्या मदतीचे निर्णय लवकरच(व्हिडिओ)

केंद्राकडून दूध उद्योगाच्या मदतीचे निर्णय लवकरच(व्हिडिओ)

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 1:34AMपुणे : प्रतिनिधी

देशात दुधासह पावडरचे भाव पडल्यामुळे या उद्योगाला आणि शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून  दूध पावडर निर्यातीला प्रोत्साहनपर आर्थिक मदतीची घोषणा अपेक्षित आहे. याशिवाय तूप आणि लोणी या पदार्थावरील वस्तू आणि सेवाकराचा तथा जीएसटीचा दर 12 वरून 5 टक्क्यांपर्यंत खाली आणावा आणि शालेय माध्यान्ह भोजनात दुधाचा समावेश करण्याच्या मागण्या केल्या आहेत. त्यावर दूध उद्योगाच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय लवकरच घेतले जातील, अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी बुधवारी येथे दिली. 

राज्य सरकारने गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटरला 27 रुपये निर्धारित केला असला, तरी सद्यःस्थितीत हे भाव 16 ते 17 रुपयांपर्यंत खाली आलेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर सहकारी, खासगी दूध व्यावसायिकांची संयुक्त बैठक त्यांच्या उपस्थितीत झाली; त्यावेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर इंदापूर येथील सोनाई दुधाचे अध्यक्ष दशरथ माने, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे उपाध्यक्ष गोपाळ म्हस्के, स्वराज दुधाचे रणजित निंबाळकर यांच्यासह बैठकीस कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाचे सरव्यवस्थापक आर. सी. शहा आदींसह अन्य दूध व्यावसायिक उपस्थित होते.