Wed, Apr 24, 2019 08:29होमपेज › Pune › विविध उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात

विविध उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 11:21PMपुणे : प्रतिनिधी

शहरासह उपनगरांमध्ये 72 वा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजवंदन, विद्यार्थ्यांची भाषणे, शहिदांच्या स्मरणांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शहरातील श्रीमंत जयभवानी मित्र मंडळाच्यावतीने ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रभाकर दिवसे, अशोक गायकवाड, गोरख बिरदवडे, हनुमान ननवरे, रमेश डोंबाळे, अप्पा कुकर, जितेंद्र ढवळे, दत्ता ढोले, संदीप लोंढे, भाऊ नाईक, विशाल गर्दे उपस्थित होते. हनुमान व्यायाम मंडळाच्यावतीने स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रभाग क्रमांक 18 जनता दलाच्यावतीने घोरपडे पेठेतील कै. रामभाऊ ननावरे चौकात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अशोक गायकवाड, इस्माईल शेख, इब्राईम यवतमाळवाले, धनश्री तांबे, हनुमान ननावरे, प्रभाकर दिवसे, प्रकाश दुबे उपस्थित होते.  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कार्यालयात खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या अध्यक्षतेखाली पंडित कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अ‍ॅड, जयवंत गायकवाड, रवींद्र माळवदकर, मिलींद वालकडकर, रवी चौधरी, दत्तात्रय गायकवाड, विनायक चांचर, राजू गिरे, निलेश निकम, जानकु कदम, सुनील खाटपे, वासंती काकडे, विशाल तांबे, राजेंद्र देशमुख, अविनाश ओव्हाळ उपस्थित होते. मृत्यूजंय मित्र मंडळाच्यावतीने शिवाजीनगर परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अ‍ॅड फैय्याज शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तुषार पंडीत, प्रतिभा शिंदे, वल्लभ कसोळे, मंगेश खेडेकर, रोहित पंडीत, सुनील पंडीत, स्वप्नील भस्मारे उपस्थित होते. महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्यावतीने विनायक मानेंनी ध्वजारोहण केले. तर प्रियदर्शनी शिक्षण संस्थेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्रद्धा कक्कड यांनी झेंडावंदन केले. यावेळी पंडीत कांबळे, शशिकला कुंभार, वर्षाराणी कुंभार, महेश कुंभार, दिपाली जांभकर उपस्थित होते. पुणे शहर काँग्रेस क्रिडासेलच्यावतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त खाऊवाटप करण्यात आला. यावेळी सचिन सावंत, विनोद पुरोहित, नितीन जोशी, नंदन मनोहर, रोहित गुरव, अक्षय सोनावणे उपस्थित होते. पुणे शहर काँग्रेस कमिटी, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने हडपसर सातेसतरानळी विभागातील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी श्रद्धा भांतब्रेकर आणि प्रदेश सचिव डॉ. उज्ज्वला हाके यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. यावेळी बापूराव सोलनकर, संदीप शेंडगे, विनायक रूपनवर, सविता पाटील, सविता जोशी  उपस्थित होते. तसेच फुले-साठे-आंबेडकर विचार फांऊडेशनच्यावतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मोहन सोनवणे, साधना सोनवणे, योगिता सावंत, कमल भोसले, आश्‍विनी चव्हाण, सुजाता बोडेकर, यश दहातोंडे उपस्थित होते. ताज फांऊडेशनच्यावतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. रफीक शेख, दीपक शिरवळकर, अ‍ॅड. भुपेंद्र शेडगे, शिरीष चरवड, बाळासाहेब हिमगिरे उपस्थित होते. शाहिर अण्णाभाऊ  साठे मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायटीच्यावतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी रमेश मोरे, शाम कांबळे, प्रकाश पवार, विजय कसबे उपस्थित होते.