Wed, Apr 24, 2019 21:53होमपेज › Pune › जय भवानी जय शिवाजी

जय भवानी जय शिवाजी

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 12:03AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात शिवजयंती विविध कार्यक्रमांनी व उत्साहाने साजरी करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी दुचाकींवर भगवे झेंडे लावत काढण्यात आलेल्या रॅली, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा असा प्रचंड उत्साह दिसून येत होता. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शानदार मिरवणुका, व्याख्याने यांसारखे उपक्रम राबवण्यात आले होते. विविध तरुण मंडळांच्या तरुणांनी मशाल पेटवून रस्त्यावरून फेरी काढली. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ढोल, ताशा व झांज पथक यांनी वातावरणात उत्साह निर्माण केला, तर शहरातील काही भागांमध्ये भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास; तसेच महापालिका भवनातील त्यांच्या प्रतिमेस महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  अभिवादन करण्यात आले.

भक्ती-शक्ती उद्यानात सकल मराठा समाजाच्या वतीने शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी  शिवबा, जिजाऊ व मावळ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले लक्ष वेधून घेत होती. संयोजन नुकुल भोईर यांनी केले.

काळभोरनगर येथील चांगभले प्रतिष्ठानच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 15 फूट उंच पुतळा लक्षवेधक होता. किनारा प्रतिष्ठानच्या वतीने शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. आकर्षक सजावट करण्यात आली होती.

भक्ती-शक्ती उद्यान, एचए वसाहत, भोसरी शिवस्मारक, डांगे चौक येथील पुतळा, पिंपरी गावातील शिवाजी महाराज पुतळा येथे शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांची एकच गर्दी उसळली होती.
चिंचवड गाव येथील शिवगर्जना ग्रुपच्या वतीने मिरवणूक काढून व दीपोत्सव करून शिवजयंती साजरी करण्यात आली. संतोष माचुत्रे यांनी संयोजन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी-पिंपरी येथे शिवजयंतीनिमित्त शहराध्यक्ष संजोग वाघेरे (पाटील) यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गोरक्ष लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले व शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीच्या कालखंड उलगडून सांगितला.  प्रास्ताविक शकु्रल्ला पठाण यांनी केले.  यावेळी महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, पक्षप्रवक्ते फजल शेख, विजय लोखंडे,  वर्षा जगताप, सुनील गव्हाणे, विनोद कांबळे, कविता खराडे, वर्षा शेडगे, पुष्पा शेळके, यतीन पारेख, अशोक कुंभार, संजय औसरमल, हमीद शेख, निर्मला माने, विशाल काळभोर, संदीप पाटील, मनीषा गटकळ, रूपाली गायकवाड, सूर्यकांत पात्रे  आदी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळाच्या वतीने काळेवाडी येथील तापकीर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोवाडे, प्रेरणागीत सादर करण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव  मल्हारी तापकीर, नितीन पवार, धनाजी येळकर, पाटील, विवेक तापकीर, महेश गवारे, भालचंद्र फुगे, प्रशांत सपकाळ, अर्चनाताई मेंगडे, गौरव धनवे; तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. या वेळी कै. श्री. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका जयश्री पवार व उल्का जगदाळे यांनी आभार मानले.
इंधन व वीजबचतीचा संदेश 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ट्रस्टचे ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालयामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली. या वेळी संस्थेचे संस्थापक विठ्ठल गवळी यांनी इंधन व वीजबचतीचा संदेश दिला. याप्रसंगी संचालक बाळासाहेब सावंत, मुख्याध्यापक राहुल गवळी, प्रज्ञा सोनवणे, एस. बी. निकाळजे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामध्ये शिवरायांचे कार्य कथित केले; तसेच शिवसाहित्य आणि शिवग्रंथ याविषयी माहिती दिली. 

लक्ष्मीबाई तापकीर विद्यालयात शिवजयंती 

शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचालित, भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर, श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय; तसेच एलबीटी इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास संस्थेचे संस्थापक अ‍ॅड. सतीश घरत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी सागर तापकीर, नितीन पवार, शशिकांत वाखारे आदी उपस्थित होते. 

रहाटणी येथे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन

रहाटणी येथील डी. एस. प्रतिष्ठान व श्रीमती लताबाई पवार सार्वजनिक ग्रंथालय यांच्या विद्यमाने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी राजू पवार यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी अ‍ॅड. केशव घोगरे, तुकाराम शिंदे, अनिल पानसरे, संतोष पानसरे, मयूर पवार, सचिन राऊत, गणेश पांचाळ, अशोक देशमुख आदी उपस्थित होते. 

भोसरी येथे दुचाकी रॅली 

भोसरी येथील अमित झोंबाडे मित्र परिवारातर्फे भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी अमित झोंबाडे, योगेश वाडेकर, मंजुनाथ बोरगी, अक्षय गुंजाळ आदी उपस्थित होते. 

शिवजयंती उत्सवात महिलांचे नेतृत्व

चिखली येथील स्वराज्य हौसिंग सोसायटी घरकुलमध्ये शिवजयंतीनिमित्त महिलांनी स्वत: नेतृत्व करून शिवजयंती उत्साहात साजरी केली. यावेळी सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक शफी मणियार यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी सोसायटीमधील सदस्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले.