Wed, Apr 01, 2020 07:58होमपेज › Pune › जातीच्या जानव्यामध्ये कुसुमाग्रजांना बंदिस्त करू नका : डॉ. श्रीपाल सबनीस (video)

जातीच्या जानव्यामध्ये कुसुमाग्रजांना बंदिस्त करू नका : डॉ. श्रीपाल सबनीस (video)

Last Updated: Feb 27 2020 5:07PM

डॉ. श्रीपाल सबनीसपुणे : पुढारी वृत्तसेवा 

मराठी भाषा दिन हा कुसुमाग्रजांच्या वाढदिवसा दिवशी साजरा करणे म्हणजे हा एका कवीचा, एका साहित्यिकाचा सन्मान आहे, असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी कुसुमाग्रजांच्या प्रतिभेला कोणत्याही जातीचे जानवे घालता येणार नाही. मराठी भाषेच्या सर्व छटा या कुसुमाग्रजांच्या साहित्यात आहेत. मराठी भाषेच्या अभिजातपणाने बोलीभाषांचे सामर्थ्य स्वीकारून प्रमाणभाषा समृद्ध करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. 

'मराठी भाषा संवर्धनासाठी शासन स्तरावर प्रयत्नांची गरज' (video)

तसेच भाकरीची भाषा जगण्याची भाषा म्हणून जोपर्यंत मराठी पुढे येत नाही तोपर्यंत दुय्यम वागणूक असलेला सासुरवास मराठीला मिळतच राहणार असेही डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले.