Wed, May 22, 2019 23:25होमपेज › Pune › असह्य उकाड्याने नागरिकांचे हाल

असह्य उकाड्याने नागरिकांचे हाल

Published On: May 14 2018 1:55AM | Last Updated: May 14 2018 12:47AMपिंपरी : प्रतिनिधी

शहराच्या तापमानात घट झाली असली तरी ढगाळ वातावरण आणि दिवसभर उकाडा यामुळे शहरवासीय हैराण झाले होते. ढगाळ वातावरण असले तरी दिवसभर उकाडा कायम राहिला. बाहेर उकाडा आणि घरात घामाच्या धारांनी नागरीक त्रस्त झाल्याचे दिसून आले. 

मे महिन्यातील वाढत्या तापमानाचा नागरिकांनी धसका घेतला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे रविवारी सुटीचा दिवस असूनही दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य दिसून आले. सकाळी 9 वाजतापासून उन्हाचे चटके असाह्य होऊ लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. इतर वेळी गजबजलेला पिंपरी कॅप परीसरात दुपारच्या वेळी शुकशुकाट जाणवला. सध्या काही शाळा-महाविद्यलयांनाही सुट्या लागल्या असल्याने दुपारी शहरात निरव शांतता पसरल्याचे दिसून येत आहे. . तसेच लग्नसराई संपल्याने आता बाजारपेठा ओस पडल्याचे चित्र नजरेस पडत आहे. 

दरम्यान, रविवारी (दि.13) शहरात 39 अंश सेल्सीयस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली तर किमान तापमान 22.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. शहराच्या तापमानात मागील चार दिवसांच्या तुलनेत घट झाली असली तरी तरी रविवारी उकाड्याने नागरीक हैराण झाले होते. सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शहरातील काही भागात पावसाच्या सरी पडल्या. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला.