Wed, Feb 20, 2019 13:02होमपेज › Pune › कार्ला  बोटिंग क्लब बंद; पर्यटकांत नाराजी

कार्ला  बोटिंग क्लब बंद; पर्यटकांत नाराजी

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 15 2018 11:16PMकार्ला : वार्ताहर

लोणावळा, खंडाळा, कार्ला, पवनानगर हा भाग थंड हवा असल्याने लाखो पर्यटक सुट्यांची मजा घेण्यासाठी कुटुंबासह येत असतात. सध्या मे महिन्याच्या सुट्यांचा आनंद घेत असताना कार्ला एमटीडीसी येथील बोटिंग बंद असल्याने पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत आहे. 

कार्ला येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटन स्थळ म्हणून अनेक वर्षापासुन नाव आहे.या ठीकाणी राहण्याची सोय, वाटर पार्क, हॉटेल, कॉन्फरन्स हॉल, लग्न समारंभासाठी गार्डन, मुलांना खेळण्यासाठी बाग, मनोरंजनाचे साहित्य अशा अनेक सुविधा पर्यटकांना  मिळतात. लोणावळा, खंडाळा परिसरात हॉटेलची संख्या वाढत असून, वॉटर पार्क, पवनानगर परिसरात पवना धरणात बोटिंग, टेंट या सुविधा वाढल्या असल्यातरी थंड हवा व जास्त सुविधा एकाच जागी असल्याने  पर्यटकांची पसंती  कार्ला एमटीडीसी पर्यटन स्थळाला मिळते; परंतु आता याठिकाणी सुविधा मिळत नसल्याने पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत आहे. 

यामध्ये प्रामुख्याने गेल्या तीस ते चाळीस वर्षापासुन पर्यटकांची पसंती असलेला इंद्रायणी नदीवरील बोटिंग सफर दोन वर्षापासून बंद असल्याने पर्यटक एमटीडीसीकडे फिरकेनासे झाले आहेत. यामुळे पर्यटनावर देखील याचा परिणाम होताना दिसत आहे. अनेक पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक व्यावसायिकांनवर देखील याचा परिणाम होऊन बेरोजगारी वाढत  आहे.याबाबत   एमटीडीसी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता बोटिंग क्लब बंद असण्याचे कारण सांगण्यात आले की महाराष्ट्र पाठबंधारे विभागाकडे रॉयल्टी भरल्याशिवाय बोटिंग क्लब चालू करू नये, असे सांगण्यात आल्याने तो सध्या बंद ठेवण्यात आला आहे.