Sun, Apr 21, 2019 13:47होमपेज › Pune › सावधान नो ट्राफिक व्हायोलेशन झोन मोहिम सुरू

सावधान नो ट्राफिक व्हायोलेशन झोन मोहिम सुरू

Published On: Dec 07 2017 1:23AM | Last Updated: Dec 07 2017 1:10AM

बुकमार्क करा

पुणे ः

शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेने कंबर कसली आहे. त्यासाठी वाहतूक परिमंडळाच्या चारही परिमंडळात ‘नो ट्रॅफिक व्हायोलेशन झोन’ मोहीम राबविण्यात येणार आहे. नियमभंग करणार्‍या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी जादा अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे. 
नो-पार्किंग, सिग्नल तोडणे, उलट दिशेने प्रवास करणे, वाहन परवाना नसणे, हेल्मेट परिधान न करणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, ट्रीपल सीट, सीट बेल्ट न लावणार्‍या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

वाहतूक विभागाच्या चारही परिमंडळाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या वतीने ‘नो ट्रॅफिक व्हायोलेशन झोन’ मोहिमेची सुरूवात बुधवारपासून करण्यात आली आहे. खडक विभागात जेधे चौक ते एस.पी. कॉलेज चौक, फरासखाना विभागात गाडीतळ पुतळा चौक ते बुधवार चौक, विश्रामबागमध्ये  सेवासदन चौक ते बुधवार चौक, नळस्टॉप चौक ते करिष्मा चौक, वारजेमध्ये नवले ब्रीज ते वडगाव ब्रीज चौक, डेक्कनमध्ये तुकाराम पादुका चौक ते गुडलक चौक, शिवाजीनगरमध्ये शिमला ऑफिस चौक ते गाडीतळ पुतळा चौकामध्ये कारवाई करण्यात येणार आहे.

परिमंडळ दोनमधील ठिकाणे ः स्वारगेट विभागात व्होल्गा चौक ते मार्केटयार्ड चौक, सहकारनगरमध्ये पुष्पमंगल चौक ते चंदलोक चौक, दत्तवाडीमध्ये सावरकर पुतळा चौक ते दांडेकर पुल चौक, भारती विद्यापीठमध्ये विद्यापीठ मागील गेट ते आंबेडकर पुतळा, बंडगार्डनमध्ये आय.बी चौक ते ब्ल्यु नाईल चौक, कोरेगाव पार्कमध्ये कोरगाव चौक ते ए.बी.सी चौकात कारवाई करण्यात येणार आहे. परिमंडळ तीनमधील ठिकाणे ः चतुश्रृंगी विभागात बाणेरफाटा ते विद्यापीठ चौक, सांगवीमध्ये जगताप चौक ते कोकणे चौक, पिंपरीत डॉ.आंबेडकर पुतळा चौक ते शगुन चौक, भोसरीत हॅरीस ब्रीज ते फुगेवाडी, चिंचवडमध्ये बिजलीनगर ते वाल्हेकरवाडी टी जंक्शन चौक, कारवाई करण्यात येणार आहे.

परिमंडळ चारमधील ठिकाणे ः येरवडा विभागात सीसीडी चौक ते श्रीकृष्ण हॉटेल चौक, हडपसरमध्ये नोबल हॉस्पिटल ते मारूती सुझूकी शोरूम, वानवडीमध्ये फातिमानगर-इनामदार हॉस्पिटल ते जगताप चौक, खडकीमध्ये बोपोडी चौक ते खडकी बाजार र्चौक, विश्रांतवाडीमध्ये चंद्रमा चौक ते विश्रांतवाडी चौक, कोंढव्यामध्ये खडी मशीन चौक ते शत्रुजंय मंदिर चौकामध्ये कारवाई करण्यात येणार आहे.