Sat, Mar 23, 2019 16:10होमपेज › Pune › तस्करी करून आणलेले ९८ लाख ८३ हजाराचे सोने पकडले

तस्करी करून आणलेले ९८ लाख ८३ हजाराचे सोने पकडले

Published On: May 04 2018 12:01AM | Last Updated: May 04 2018 12:00AMपुणे : प्रतिनिधी

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अबू धाबीवरून आलेल्या विमानातून महिलेकडून सिंथेटीक रबर पेस्टमध्ये लपवून तस्करी करून आणलेले ३ किलो ४१ किलो वजनाचे सोने सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. या महिलेला अटक करण्यात आली आहे. या सोन्याची आंतराराष्ट्रीय बाजारातील किंमत ९८ लाख ८३ हजार २५० रुपये आहे.

रेहाना फैजान अहमद खान (कुर्ला मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी पहाटे अबू धाबीवरून आलेल्या जेट एअरवेजच्या फ्लाईट क्रमांक ९ डब्लू-५१३ मधून रेहाना फैजान अहमद खान ही महिला उतरली. त्यानंतर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तिची झडती घेण्यात आली. त्यावेळी सिंथेटीक रबरची पेस्ट असलेल्या सहा पिशव्या पकडण्यात आल्या. त्या रबर पेस्टमध्ये ३०४१ वजनाचे सोने आढळून आले. त्यानंतर तिच्याकडून सोने जप्त करून अटक करण्यात आली. पुढील तपास सुरु असल्याची माहिती पुणे विमानतळावरील सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त भारत नवले यांनी दिली. गेल्या काही काळापासून दुबई व इतर देशातील तस्कर पुणे विमानतळावरून भारतात सोने आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी महिलांसह पुरूषांचा कुरियर म्हणून वापर केला जात आहे. यामुळे पुणे विमानतळावर कडक तपासणी केली जात आहे. यापूर्वी सोन्याच्या बारीक तार, थर्मासच्या आतील बाजूस सोने लावणे यासह अन्य पद्धतीचा वापर केला जात आहे. सीमा शुल्क विभागाने प्रथमच सिंथेटीक रबरामध्ये सोने लपवून आणणार्‍या महिलेला अटक केली आहे.