Fri, Nov 16, 2018 22:13होमपेज › Pune › कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड यांचा राजीनामा 

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड यांचा राजीनामा 

Published On: Apr 07 2018 6:34PM | Last Updated: Apr 07 2018 6:32PMपुणे : प्रतिनिधी 

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विद्यमान उपाध्यक्ष अतुल गायकवाड यांनी आपल्या पदाचा आज (शनिवार दि. ७ एप्रिल) ला राजीमाना दिला. उपाध्यक्षपदाचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.डी.एन.यादव यांच्याकडे सुपूर्त केला. गायकवाड यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर आता कोणास संधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सत्तेत भारतीय जनता पार्टी असून, त्यांचे पाच नगरसेवक तीन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत निवडून आले आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवून दिलेल्यानुसार प्रत्येक नगरसेवकास ‘उपाध्यक्ष’ पदाची एक वर्षासाठी  संधी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच त्यावेळीच केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात महिला नगरसेविका डॉ.किरण मंत्री यांना उपाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली होती. मंत्री यांचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर दिलीप गिरमकर हे दुस-या टप्प्यात उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर सद्या विद्यमान असलेले उपाध्यक्ष अतुल गायकवाड यांना पक्षाने संधी दिली होती. कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

दरम्यान गायकवाड यांच्यासह आतापर्यत तीन नगरसेवकांना ‘उपाध्यक्ष’पदाची संधी मिळाली आहे. अजुन दोन नगरसेवक उपाध्यक्षपदाच्या रांगेत असून ,त्यामध्ये महिला नगरसेविका  प्रियंका श्रीगिरी आणि विवेक यादव यांचा समावेश आहे. या दोन नगरसेवकांपैकी आता नक्की कोणाच्या गळ्यात ‘उपाध्यक्ष’ पदाची माळ पडणार हे पाहावे लागणार आहे. 
 

Tags : pune, pune news, Cantonment Board, Atul Gaikwad, resign,