Tue, Sep 25, 2018 04:58होमपेज › Pune › लिपिकांच्या बदल्यांचा स्थगिती आदेश रद्द करा : विरोधी पक्षनेते दत्ता साने 

लिपिकांच्या बदल्यांचा स्थगिती आदेश रद्द करा : विरोधी पक्षनेते दत्ता साने 

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 27 2018 12:46AMपिंपरी : प्रतिनिधी

पालिका प्रशासनाने महिन्यापूर्वी 9 लिपिकांच्या अंतर्गत बदल्या केल्या होत्या. त्यापैकी शिक्षण विभाग आणि करसंकलन विभागातील दोन लिपिक बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. बदलीचा आदेश झुगारून लिपिकांनी राजकीय दबाब टाकून बदलीला स्थगिती आणली आहे. ती स्थगिती रद्द करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

शिक्षण विभाग आणि करसंकलन विभागातील दोन लिपिक बदलीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. बदलीचा आदेश झुगारून लिपिकांनी राजकीय दबाब टाकून बदलीला स्थगिती आणली, यावरून प्रशासन व आपला दुटप्पीपणा उघड झाला आहे. यासंदर्भात ‘पुढारी’ने ‘पालिकेच्या दोन लिपिकांची बदली रद्द’ या शीर्षकाखाली शुक्रवारी (दि.24) वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन साने यांनी ही मागणी केली आहे. राजकीय दबावामुळे सदरच्या बदल्यांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे ठराविक अधिकारी व कर्मचारी यांना वेगळा न्याय दिला जात आहे. त्याबाबत आयुक्तांची दुटप्पीपणाची भूमिका स्पष्ट होत आहे, असे साने यांनी निवेदनात म्हटले आहे.