Mon, Mar 25, 2019 13:15होमपेज › Pune › ‘निगडी-दापोडी बीआरटीएस रद्द करा’

‘निगडी-दापोडी बीआरटीएस रद्द करा’

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 11 2018 10:32PM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

निगडी ते दापोडी ‘बीआरटीएस’ मार्ग असुरक्षित, धोकादायक आणि नियमबाह्य असल्यामुळे तो रद्द करावा, अशी मागणी सार्वजनिक वाहतूक सुधारणा समिती समन्वयक काशीनाथ नखाते यांनी केली.

बुधवारी (दि.10) सार्वजनिक वाहतूक सुधारणा समितीने ‘बीआरटीएस’ मार्गात सुरक्षा, होणारा धोका याबाबत नागरिकांत जनजागृती केली. जनतेवर  लादलेल्या ‘बीआरटीएस’चा निषेध यावेळी करण्यात आला. याप्रसंगी समिती समन्वयक काशीनाथ नखाते, समिती सदस्य संजय मालाडकर, विजय निकाळजे, इरफान चौधरी, संतोष गायकवाड, ओमप्रकाश मोरया, कासीम तांबोळी आदी  उपस्थित होते.

नखाते म्हणाले, जागतिक बँक आणि तत्सम संस्थांच्या मागणीनुसार केवळ ‘जेएनएनयूआरएम’चा निधी लाटायच्या उद्देशाने या मार्गाची निर्मिती केली. 

महापालिकेच्या चुकांमुळे दररोज अपघात होत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेविषयी उपाययोजना न केल्यामुळे उच्च न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय मार्ग सुरू करण्यास प्रतिबंध घातला आहे.. या मार्गावरील अत्यंत धोकादायक म्हणजे ‘मर्ज इन’ आणि ‘मर्ज आऊट’ या मार्गातून बाहेरील रस्ता भेदून जात असल्याने दररोज अपघात होण्याची शक्यता आहे.