Tue, Jul 16, 2019 22:06होमपेज › Pune › प्लास्टिक बंदीचा कायदा रद्द करा

प्लास्टिक बंदीचा कायदा रद्द करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारने नोटबंदीसारखा प्लास्टिक बंदीचा निर्णय रातोरात घेऊन हजारोंना बेरोजगार केले आहे. शासनाच्या प्लास्टिकबंदी कायद्याला आमचा विरोध असून, आम्ही शासनाचा निषेध करीत आहोत. शासनाच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, सरकारने न्यायालयाचाही अवमान केला असल्याचा आरोप महाराष्ट्र प्लास्टिक मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवी जशानी, सचिव निखिलेश राठी व माजी अध्यक्ष प्रमोद शहा यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. 

सरकारच्या वतीने 2 जानेवारी रोजी प्लास्टिकबंदीच्या काढलेल्या आदेशाविरोधात महाराष्ट्र प्लास्टिक मॅन्युफॅक्‍चर्स असोसिएशनने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र सरकारतर्फे 7 मार्च रोजी एक प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. त्या प्रतिज्ञापत्रामध्ये शासनाने 2 जानेवारी रोजी काढलेला आदेश ही केवळ गाईडलाइन असून, अंतिम आदेश नाही, असे कबूल केले आहे. अंतिम आदेश राज्य मंत्रिमंडळात मंजूर करून जाहीर निवेदन देण्यात येईल. त्यावर जनतेच्या तक्रारी मागवण्यात येणार आहेत. त्यानंतरच अंतिम आदेश करून कायद्यामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेला साधारणतः 40 ते 45 दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे शासनाने प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे. असे असताना अचानकपणे गुढीपाडव्यापासून प्लास्टिकबंदीचा निर्णय घेऊन न्यायालयाचा शासनाकडूनच अवमान होत आहे. घाईघाईने निर्णय घेतला आहे व त्याच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत, ते अन्यायकारक आहे.

Tags : Pune, Pune News, Cancel,  plastic, ban, law


  •