Thu, Jun 20, 2019 06:43होमपेज › Pune › विद्यापीठात आता सीएनजीवरील वाहने...

विद्यापीठात आता सीएनजीवरील वाहने...

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 12:49AMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात आता सीएनजीवरील वाहने धावणार आहेत. विद्यापीठातील प्रदूषण टाळण्यासाठी आणि विद्यापीठाचे नैसर्गिक सौंदर्य जपण्यासाठी विद्यापीठात सीएनजीवर चालणारी तीन वाहने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीद्वारे सीएसआर निधीतून देण्यात येणार असल्याची माहिती एमएनजीएलचे संचालक राजेश पांडे यांनी दिली. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नैसर्गिक सौंदर्य जतन करण्यासाठी वाहन मुक्त विद्यापीठ योजनेला सुरुवात करण्याची घोषणा तत्कालीन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी केली होती. वायू प्रदूषणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलवर चालणार्‍या वाहनांना विद्यापीठ परिसरात बंदी घालून प्रदूषण कमी करण्यासाठी वाहन मुक्त विद्यापीठ अशी संकल्पना राबविण्यात येणार होती. नवीन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनीही कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विद्यापीठात अंतर्गत ई-वाहतूक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.

त्यासाठी उद्योगांच्या (सीएसआर) मदतीने विद्यापीठात ई-रिक्षांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठातील अंतर्गत वाहतुकीसाठी प्रदुषण विहरित वाहनांची संख्या वाढविण्यासाठी एमएनजीएल कंपनीकडे सीएनजी वरील पाच वाहने विद्यापीठाला सीएसआर अंतर्गत देण्याची मागणी केली होती. त्यावर एमएनजीएल कंपनीद्वारे विद्यापीठाल सीएनजी वर चालणारी तीन वाहने देण्यात येणार असल्याची माहिती एमएनजीएल चे संचालक राजेश पांडे यांनी दिली. 

विद्यापीठात सीएनजीवर चालणारी तीन वाहने दाखल होणार असल्याने विद्यापीठाच्या प्रदुषण विरोधातील मोहिमेला हातभार लागणार आहे. यापूर्वी प्रदुषण टाळण्यासाठी विद्यापीठ परिसरात सायकलींचा जास्तीत जास्त वापर वाढविण्याचा प्रयत्नही विद्यापीठ प्रशासनाद्वारे कऱण्यात येत आहे. त्यासाठी विद्यापीठाद्वारे पुणे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ‘सायकल शेअरिंग’ योजना सुरू केली आहे. विद्यापीठात ‘झुमकार पेडल’च्या डिसेंबर 2017 महिन्यात सुमारे 100 सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विद्यापीठाकडे बॅटरीवर चालणारी दोन वाहने उपलब्ध आहेत. त्यापैकी एका वाहनाद्वारे विद्यापीठातील अंतर्गत वाहतुक तुर्तास सुरु आहे. यामध्ये महिन्याभरात दाखल होणार्‍या सीएनजी वरील तीन वाहनांमुळे भर पडणार आहे.

विद्यापीठात बॅटरीवर चालणारी दोन वाहने उपलब्ध आहेत. यामध्ये आणखी दोन वाहनांची वाढ करण्यात येणार होती. दरम्यान, बॅटरी वरील वाहनांच्या कार्यक्षमता कमी होत असल्याने विद्यापीठ प्रशासनाने सीएनजी वरील वाहनांने घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एमएनजीएल कंपनीकडे सीएसआर अंतर्गत पाच सीएनजीवर चालणार्‍या वाहनांची मागणी विद्यापीठाद्वारे करण्यात आली. त्यावर कंपनीने तीन वाहने देण्याचे मान्य केले असून ही वाहने मिनी बस सारखी असणार असून त्याचा अंतर्गत वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी दिली.