Sun, Apr 21, 2019 13:47होमपेज › Pune › दंगेखोरांची गय केली जाणार नाही : मुख्यमंत्री

दंगेखोरांची गय केली जाणार नाही : मुख्यमंत्री

Published On: May 12 2018 6:29PM | Last Updated: May 12 2018 6:30PMपुणे : पुढारी ऑनलाईन

औरंगाबाद शहरातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. औरंगाबाद शहरात झालेल्या हिंचाराबद्दल फडणवीस म्हणाले की,  सर्व समुदयाच्या लोकांना एकत्रित करुन शांतता रहावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांची मोठी कुमक अद्यापही शहरात तैणात करण्यात आली आहे. दंगा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल, असे फडणवीस यावेळी म्हणाले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगावी, असे आवाहन फडणवीसांनी केले.

औरंगाबाद शहरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून दोन गटातील किरकोळ वाद टोकाला गेला होता. दोन गटात झालेल्या तुफान हणामारीने हिंसाचाराचे वळण घेतले. शहरातील मोतीकारंजा परिसरात दोन गट तलवारी, चाकूसह शुक्रवारी रात्री भिडले. त्यानंतर शहागंजमध्ये जाळपोळीत एकाचा बळी गेला. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारातही एकाला जीव गमवावा लागला. याशिवाय दगडफेकीत अनेक नागरिकांसह पोलिस कर्मचारी आणि अधिकारी देखील जखमी झाले आहेत.