Sat, Nov 17, 2018 04:32होमपेज › Pune › कोरेगाव भीमा प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी

कोरेगाव भीमा प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 12:43AMपुणे : प्रतिनिधी

कोरेगाव भीमा परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात दंगल सदृश परिस्थीती निर्माण करून जातीयवादाला खतपाणी घालण्यात आले आहे. अशा प्रकरणाच्या पडद्याआड अनेक संशयित आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणाच्या परिस्थितीतीला वढू येथील गोविंद गायकवाड यांच्या समाधीची विटंबना केली गेली, ही पार्श्‍वभुमी आहे. यामध्ये मुख्य सुत्रधार म्हणून मिलींद एकबोटे व संभाजी भिडे यांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र, ते मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्यामुळे न्यायालयीन चौकशीतून दोघांनाही क्‍लिनचीट मिळू शकते. म्हणून या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हायलाच हवी, असे रिपाई मातंग आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष हनुमंत साठे यांनी सांगितले.

या प्रकरणाची पुणे शहर व जिल्ह्यातील मातंग समाजाने तसेच त्यांच्याशी संबधित संघटनांनी गंभीर दखल घेतली असून प्रकरणाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले असल्याचे साठे यांनी सांगितले. यावेळी लहुजी समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल हाताळगे, ज्येष्ठ विचारवंत रमेश राक्षे उपस्थित होते.