Mon, Sep 24, 2018 16:57होमपेज › Pune › पुण्यात २५ लाखासाठी व्‍यावसायिकाचे अपहरण

पुण्यात २५ लाखासाठी व्‍यावसायिकाचे अपहरण

Published On: Apr 10 2018 11:05AM | Last Updated: Apr 10 2018 11:05AMपिंपरी : प्रतिनिधी 

एज्युकेशन सेमीनार एकत्र केल्यानंतर त्‍यामध्ये झालेले २५ लाख नुकसान भरपाई द्यावी, यासाठी एका भागीदारचे अपहरण करुन, मारहाण करून जबरदस्तीने दोन लाख ४० हजार आणि कार घेऊन गेल्याची घटना सोमवारी रात्री घडली. ही घटना बावधन ते खेड शिवापुर दरम्यान घडली.

संदीपकुमार झुंबरलाल पोखराणी  (४३, रा. बावधन) असे अपहरण व सुटका झालेल्याचे नाव आहे. तर कृष्णा वारे व त्याच्या साथीदाराने हा प्रकार केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोखराणी यांचे एज्युकेशन संस्था आहे. काही  पोखराणी आणि वारे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यशाळा घेतली होती. यामध्ये वारे याचे नुकसान झाल्याने त्यांच्यात वाद सुरु होते. सोमवारी रात्री पोखराणी आणि नितीन सांगळे हे दोघे जेवायला निघाले होते. त्यावेळी त्यांना वारे भेटले. त्यांनी जबरदस्तीने पोखराणी व सांगळे या दोघांना त्यांच्या गाडीत बसवले. त्यानंतर त्यांना खेड शिवापूर येथे घेऊन गेले. नुकसान झालेले २५ लाख दे म्हणून मारहाण केली. पोखराणी याच्या घरी आले जबरदस्तीने घरातील दोन लाख ४० हजार आणि कारची चावी काढून घेतली व कार घेऊन गेले. यानंतर सकाळी पोखराणी यांनी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले होते.