Wed, May 22, 2019 22:45होमपेज › Pune › मध्यरात्रीनंतर बसप्रवास असुरक्षित 

मध्यरात्रीनंतर बसप्रवास असुरक्षित 

Published On: May 13 2018 2:16AM | Last Updated: May 13 2018 12:20AMटीम पुढारी : शिवाजी शिंदे, महेंद्र कांबळे, ज्ञानेश्‍वर भोंडे, समीर सय्यद, शंकर कवडे, केतन पळसकर, नरेंद्र साठे. 

शहरात मध्यरात्रीनंतर रातराणी बसचा प्रवास किती सुरक्षित आहे, याची ‘टीम पुढारी’ने शनिवारी प्रत्यक्ष प्रवास करून पाहणी केल्यावर धक्कादायक चित्र दिसून आले. मद्यपींकडून सहप्रवाशांबरोबर वाहकावर दादागिरी, थांब्यावर टोळक्यांकडून त्रास तसेच वेळेचे पालन होत नसल्याने मध्यरात्रीनंतरचा बस प्रवास सुरक्षित नसल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. 
• शहरात सहा मार्गांवर ‘रातराणी’ बसेस धावत आहेत. प्रत्येक मार्गावर एक बस याप्रमाणे सहा बसेस धावत आहेत. साधारणपणे अर्धा ते एक तास या अंतराने  बसेस आहेत.
 रातराणी बसेस रात्री साडेअकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत धावत असतात. 

वाहक-चालकांवरही अरेरावी मद्यपींची दहशत
 शिवाजीनगर ते कात्रज या मार्गावर रात्री उशिरानंतर वाहक-चालकांना प्रवाशांच्या अरेरावीला सामोर जावे लागत असल्याचे  दिसून आले.  काही ठराविक भागात मद्यपी प्रवाशांकडून वाहकांना धमकावण्याचे प्रकार होतात, अशा वेळी इतर प्रवासी मदत करीत असल्याचे देखील वाहकांनी सांगितले. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबरोबरच वाहक-चालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दादेखील समोर येत आहे.
वेळ रात्री बाराची... उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे शिवाजीनगर परिसरात एसटीमुळे वाहतूक कोंडी झालेली... शिवाजीनगर रेल्वेस्टेशनच्या बाहेर कात्रजला जाणारे प्रवासी पीएमपीएमएल बस येण्याची वाट पहात  थांबलेले असतात.

एवढ्यात एक कंडक्टर येतो आणि कात्रजला येणारे प्रवासी चला माझ्या बरोबर म्हणून पुढे चालू लागतो... त्याच्या सोबत सतरा ते अठरा प्रवासी त्याच्या मागोमाग जातात... रस्ता ओलांडण्यास कंडक्टर ज्येष्ठांना मदत करतो आणि बँक ऑफ महाराष्ट्र समोर उभ्या असलेल्या बसमध्ये प्रवासी बसतात... रात्री 12 वाजून 7 मिनिटांनी बस कात्रजकडे निघते. बसमध्ये चार महिला, त्यातील एका महिलेसोबत छोटा मुलगा असतो. मात्र, उशीर झाल्याची थोडी देखील त्यांना चिंता नव्हती. कारण रोजच्या प्रवासामुळे वाहक या चार महिलांच्या परिचयाचा होता. काही दिवसांपूर्वी बसने प्रवास करणार्‍या कुटुंबाला वाहकाच्या अरेरावीला सामोरे जावे लागले, या अनुषंगाने ‘पुढारी’च्या प्रतिनिधींनी रात्री बारानंतर बसने प्रवास करून प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली.

 शिवाजीनगरहून कात्रजकडे निघालेली बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी होते. शिवाजीनगरहून पुढे बस निघाल्यानंतर मनपाच्या थांब्यावर जास्त प्रवासी बसले, दिवसा जेवढी गर्दी असते अगदी तेवढ्याच प्रमाणात रात्री बसमध्ये गर्दी होती. मनपाला बसलेल्या दोन महिलांना दोन तरुणांनी उठून जागा करून दिली, मात्र, त्या दोघींनी देखील नको म्हणून गर्दीमध्ये उभे राहणे पसंत केले. त्या दोघीही रोजच्या प्रवासी असल्याचे कंडक्टरने नंतर सांगितले. मनमाडहून आलेल्या ज्येष्ठ जोडप्याने सांगितले की, आम्ही गावी गेलो की, नेहमी बालाजीनगरला जाण्यास याच बसने प्रवास करतो आणि हेच कंडक्टर असतात. पत्नीला घेऊन मी रात्री प्रवास अनेकवेळा केलाय. मात्र, कधी काही प्रसंग आजपर्यंत उद्भवला नाही. कंडक्टर मस्त गप्पा मारत दिवसभर घडलेले किस्से ओळखीच्या प्रवाशांना सांगत खळखळून हसवत होता. स्वारगेटला बसमध्ये पुन्हा एकदा गर्दी वाढली. बालाजीनगरच्या बस थांब्याच्या पुढे एकही महिला प्रवासी बसमध्ये नव्हती. कात्रजला ही बस रात्री 12 वाजून 42 मिनिटांनी पोचली. शिवाजीनगर ते कात्रज या बसला 35 मिनिटांचा कालावधी लागला.

पुन्हा कात्रजहून शिवाजीनगरला जाण्यासाठी रात्री 12 वाजून 55 मिनिटांनी बस मिळाली. पहिल्या बसच्या तुलनेत या बसची अवस्था अतिशय वाईट होती. प्रवासी देखील सहा ते सातच. रस्ता मोकळा असल्याने मोठ्याने आवाज करणार्‍या बसला ड्रायव्हर चांगलाच पळवत होता. कात्रज डेअरी जवळ बस थांबा सोडून मध्येच थांबलेल्या एका तरुणीने बसला हात केला. मात्र, चालकाने बस थांबवली नाही. बसचा कंडक्टर शफीक पठाण सांगत होता की, मी रोज या बसला नसतो, आजच ड्यूटी दिली आहे. अकरा वाजता माझी ड्यूटी सुरू झाली, पहाटेपर्यंत असले. सध्या गावी जाणारे कुटुंबे असल्याने एखाद-दुसरी महिला प्रवासी असते. स्वारगेटला ही बस रात्री 1 वाजून 7 मिनिटांनी पोचली. स्वारगेटला एक प्रवासी उतरला तर बसमध्ये त्यानंतर एकही प्रवासी बसमध्ये बसला नाही. तेवढ्याच प्रवाशांना घेऊन बस शिवाजीनगरला रात्री 1 वाजून 16 मिनिटांनी पोचली.

शिवाजीनगर ते कात्रज बस - निघण्याची वेळ -  रात्री 12.07 कात्रजला पोचण्याची वेळ - रात्री 12.42
बस क्रमांक चक-14 उथ-1762, वाहक - प्रफुल्ल पाटील, चालक - मनोज सावंत

कात्रज ते शिवाजीनगर बस निघण्याची वेळ - रात्री 12.55 शिवाजीनगरला पोचण्याची वेळ - रात्री 1.16 मिनिटे
बस क्रमांक चक 12 उक 5578, वाहक - शफिक पठाण, चालक लोटन पाटील

थांबे - कात्रज, डेअरी, भारती विद्यापीठ, बालाजीनगर, केके मार्केट, पद्मावती, नातूबाग, अरणेश्‍वर, भापकर पेट्रोल पंप, पंचमी, लक्ष्मी नारायण, स्वारगेट, सारसबाग, भिकारदास मारुती, शनिपार, अप्पा बळवंत चौक, दक्षिणमुखी मारुती, शनिवारवाडा, मनपा, शिवाजी पुतळा, सिमला ऑफिस, शिवाजीनगर.

रात्रीचा बसप्रवास नको रे बाबा...
पुणे स्टेशन ते वाघोली या रस्त्यावर रातराणीने प्रवास करताना असुरक्षित वाटत असल्याचे प्रवासी सांगतात. रात्रीची वेळ असल्यामुळे मद्यपी व्यक्तींचा त्रास, भांडणे, रिक्षावाल्यांची लूटमार यामुळे मध्यरात्रीनंतर प्रवास करणे धोक्याचे असल्याचे वडगाव शेरी येथील प्रवासी राम साठे यांनी सांगितले.

पुणे स्टेशन ते वाघोली ही बस क्रमांक  एमएच 12, इक्यू 8835 ही रात्री एक वाजता सुटली. बसमध्ये एकूण 32 प्रवासी होते, त्यापैकी पाच महिला होत्या. स्टेशन ते वाघोली हे  18 किलोमीटर अंतर ज्याला दिवसा एक तासापेक्षा अधिक वेळ लागतो, ते बसने बरोबर रस्त्यावर गर्दी व सिग्नल नसल्याने 30 मिनिटांत पार केले. मात्र, परत येताना केवळ दोनच प्रवासी मिळाले. रात्रीच्या वेळी महिलांची संख्या कमी असल्याने पुरुष प्रवासी रात्रीच्या वेळी महिलांच्या सीटरवरही बसताना आढळले. पण, महिला फक्त महिलांच्या सीटवर बसलेल्या दिसून येत होत्या. बहुतांश महिलांच्या सोबत ओळखीचे किंवा कुटुंबातील पुरुष होते.  म्हणजेच रात्रीच्या वेळी महिला एकटीने प्रवास करण्यापेक्षा ओळखीतल्यांचाच आधार घेऊन प्रवास करताना दिसून आले. 

 महिलांचा कमी प्रतिसाद पाहता महिलांना रात्रीच्या बसप्रवासाची भीती वाटत असल्याचे दिसून आले. हॉटेलचे आचारी, दुसरी पाळी करणारे कामगार हे प्रामुख्याने प्रवासी होते. पण, दिलासादायक बाब म्हणजे पुणे स्टेशन व नगर रस्त्यावरही पेट्रोलिंग करणार्‍या पोलिसांच्या गाड्या दिसून आल्या.  

  ‘पुणे स्टेशन ते वाघोली या दरम्यान मद्यपी व्यक्तींचा फारसा त्रास होत नाही; तसेच महिलांचा प्रवास हा सुरक्षित आहे. रात्रीची वेळ असल्याने आम्ही प्रवाशांच्या सोयीसाठी थांबा नसेल तेथेही बस थांबवतो. 
  - लालासाहेब जाधव, वाहक

 पीएमपीमध्ये महिलांना रात्रीच्या वेळी प्रवास करताना सुरक्षित वाटते; तसेच गाडीमध्ये कुणी महिलांशी गैरवर्तन केले, तर आम्ही थेट पोलिस ठाण्यात गाडी घेऊन जातो. कधी-कधी दारूडयाचा त्रास होतो. पण त्यांच्या तोंडाशी न लागणे हाच एक पर्याय उरतो. 

 - मधुकर चाटे, पीएमपी चालक

नियमित प्रवास करणार्‍या महिलाही भीतीच्या छायेत!
रात्रीच्या पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या रातराणीत महिलांच्या जागेवर घुसखोरी, मद्यपी पुरुष प्रवाशांची मुजोरी, बसमधील सुरक्षेसाठी असलेले सीसीटीव्ही बंद याकडे चालक-वाहकांकडून होणारे काहीसे दुर्लक्ष असे धक्कादायक चित्र हडपसर ते पुणे स्टेशन (बस क्र. एमएच 12 क्यूजी 1675) या रातराणी बसमध्ये दिसून आले. त्यामुळे रातराणीतील प्रवासी महिलांचा प्रवास भीतीच्या छायेत सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.

नवीन खरेदी करण्यात आलेल्या बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्हीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, गेल्या कित्येक महिन्यांपासून हे सीसीटीव्ही अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे, सुरक्षेच्या दृष्टीने बसविण्यात आलेले हे सीसीटीव्ही नुसते शोभेपुरते उरले आहेत. परिणामी, महिला प्रवाशांसह इतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न अद्यापही कायम आहे. रात्रीच्या वेळी बहुतांश प्रवासी हे व्यसनाधीन स्थितीत असतात. प्रवासादरम्यान, वाहकाशी विनाकारण वाद घालणे, महिलांशी गैरव्यवहार करणे, एकटक पाहत राहणे आदी घटना घडताना दिसून येतात. 
या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही उपयुक्त आहे. मात्र, तेच बंद असल्याने प्रशासन महिला तसेच इतर प्रवाशांच्या सुरक्षेबाबात किती गांभीर्याने लक्ष देत असल्याचे दिसून येते. 

गाडीला चावी ठेवून चालकाच्या गप्पा तर वाहक कीर्तनात मंत्रमुग्ध. शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजून 10 मिनिटांनी पुणे स्टेशनला जाण्यासाठी हडपसर बस थांब्यावर गाडी लावल्यानंतर चालक जवळपास 10 मिनिटे गाडीला चावी तशीच ठेवून निघून गेला होता. काही वर्षांपूर्वी शहरात घडलेल्या संतोष माने प्रकरणानंतरही चालकांनी अद्याप यामधून धडा घेतलेला दिसून येत नाही. त्यामुळे, चालकही प्रवाशांच्या सुरक्षेबाबत किती तत्पर असल्याचे दिसून येते. प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही वाहकावर असते. या वेळी संशयास्पद हालचाली, बसचे विद्रूपीकरण करणार्‍या प्रवाशांकडे लक्ष ठेवणे गरजेचे राहते. मात्र, शुक्रवारी ‘दै. पुढारी’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत वाहक महाराजांचे कीर्तन ऐकण्यात मंत्रमुग्ध झाले होते. त्यामुळे, बसमधील प्रवाशांना थांब्यावर उतरविण्याची जबाबदारी चालकालाच पार पाडावी लागली.

पुणे स्टेशन थांबा टवाळखोरांचा अड्डा
बसथांब्यावर दुचाकी लावून चहा तसेच धूम्रपान करणार्‍या टोळक्यांची संख्याही वाढत चालली आहे. रात्रीच्या वेळी महिला आरक्षित जागेच्या बाहेरील बाजूस थांबून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, गाडीमधील पायरीवर बसून चहा पिणे, असे चित्र पुणे स्टेशन परिसरातील थांब्यावर दिसून येते. टोळक्यातील युवकांकडून महिलांना पाहून होणारी शेरेबाजी; तसेच आपआपसात होणारी शिवीगाळ या सर्व घटनांचा त्रासही प्रवाशांना सहन करावा लागत आहे. थांबा सोडून गाडी बाहेर लावण्यात येत असल्याने गाडीमध्ये चढणे; तसेच बसून राहणे गैरसोयीचे ठरत आहे. परिणामी, थांबा परिसरात टवाळखोरी करणार्‍या या युवकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांच्या वतीने करण्यात येत आहे. 

एलईडी स्क्रीन दाखवेना थांबा, उद्घोषणाही होईना
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सेवेत नव्याने दाखल झालेल्या इंद्रधनुष्य या बसमधील एलईडी स्क्रीन; तसेच होणारी उद्घोषणा फक्त नावालाच असल्याचे दिसून येते. रात्रीच्या वेळी प्रवासादरम्यान प्रवाशांना थांब्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे, नव्याने प्रवास करणार्‍या प्रवाशांसह इतरांना थांब्याची माहिती मिळविण्यासाठी वारंवार वाहक व चालकाला विचारणा करावी लागत आहे. त्यामुळे, बसमध्ये बसथांब्याची माहिती व्हावी यासाठी लावण्यात आलेली उद्घोषणेची यंत्रणा सुरू असावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.  

गेल्या काही वर्षांत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे, रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले जाते. महिला प्रवाशांना आरक्षित ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जाते. तसेच, त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येते. प्रवाशांच्या सुरक्षेमध्ये वाहक व चालकाकडून कोणत्याही प्रकारची तडजोड केली जात नाही. महिला, ज्येष्ठ नागरिक; तसेच लहान मुलांची रात्रीच्या प्रवासादरम्यान विशेष काळजी घेतली जाते. 

- राजेंद्र नवले, वाहक
कामावरून घरी जाताना उशीर होतो. मात्र, मी एक सक्षम महिला आहे त्यामुळे बिनधास्त बसने प्रवास करते. मात्र, कधीकधी रात्रीचा प्रवास करताना असुरक्षित असल्याची भावना निर्माण होते. पुणे स्टेशनच्या थांब्यावर दररोज चहा तसेच सिगारेट पिण्यासाठी टवाळखोर युवकांची कायम वर्दळ असते. बसच्या पायरीवर बसून चहा पिणे; तसेच सिगारेट ओढण्याचे प्रकार सर्रास सुरू असतात. मुख्यत: सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी असतानाही हे प्रकार घडतात. याखेरीज, प्रवासादरम्यान, रात्रीचे बहुतांश प्रवासी हे व्यसन करून प्रवास करताना दिसतात. या वेळी, मोठ्याने गप्पा मारणे, एकटक पाहत राहणे, विचित्र हावभाव करणे अशा गोष्टी सर्रास होतात. अशा गोष्टींना आळा बसणे गरजेचे आहे. 

- प्रवासी महिला, चौकशी करायची कोणाकडे?
रातराणी आधीच तोट्यात सुरू आहे, त्यातच आता रात्रीचा प्रवास करण्यासाठी वेळेवर बस उपलब्ध होत नाही. त्यामुळे खासगी रिक्षाचालक बसस्थानकात घुसून प्रवाशांना रिक्षा प्रवास करण्यास भाग पाडत आहेत. हडपसर बसस्थानकात रातराणी बस केव्हा येणार आणि केव्हा जाणार हे सांगण्यासाठी ना कोणती व्यक्ती ? ना कोणता फलक नाही. त्यामुळे रातराणीच्या बसची चौकशी करायची कोठे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

वेळ 12 वाजून 20 मि. ठिकाण हडपसर येथील पीएमी बसस्थानक. दिवसभराचे काम आटोपून थांबलेल्या बस इथे होत्या. हडपसरहून स्वारगेटला जाण्यासाठी नेमकी बस किती वाजता आहे ? हे सांगण्यासाठी ना कोणता पीएमपीचा कर्मचारी, ना कोणता फलक दिसत होता. स्थानकाच्या आतपर्यंत खासगी रिक्षा येऊन त्यांचे प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी आवाज देत होते. बसची वाट पाहात असताना 8 रिक्षाचालक बारा मिनिटांच्या कालावधीत 12 ते 15 प्रवाशांना स्वारगेट व पुणेस्टेशनकडे घेऊन गेले. याच दरम्यान, बस किती वाजता येणार याची माहिती कोणालाही मिळाली नाही. 

परंतु, प्रवाशाला रिक्षात बसविण्यासाठी काही रिक्षाचालक बसला आजून पाऊन तास आहे असे सांगून  प्रवाशांना प्रलोभन दाखवत होता. स्वारगेटकडे जाणार्‍या प्रत्येक प्रवाशामागे रिक्षावाले त्यांना 40 रूपये दर सांगत होते. 

बसची  ताटकळत वाट पाहिल्यानंतर 23 मिनीटानंतर म्हणजे 12 वाजून 43 मिनिटांनी तेजस्विनी नाव असलेली रातराणी एमएच 12 पीक्यू 9146 क्रमांकाची बस आली. गाडी मध्ये काही तरी बिघाड झाला असल्याने एक मेकॅनिक ते पाहण्यासाठी आला. ऑईलसंबधी अचडचण असल्यााचे त्याच्या बोलण्यावरून समजले. काम पाहता पाहता त्याला फोन आल्याने बस बाहेर उतरून तो मोबाईल वर बोलत होता. पाच मिनिटाच्या कालावधीत म्हणजे 12 वाजून 48 मिनिटांनी बस निम्म्याय्याहून अधिक भरली. यामध्ये कामावरून घरी निघालेले बांधकाम साईटवर काम करणारे कामगार हे आपल्या पत्नीबरोबर होते. तो पर्यंत वाहक आणि चालक जवळच असलेल्या पेपरच्या लोखंडी स्टॉल वर बसुन एक वाजण्याची वाट पाहत होते. 12 वाजून 58 मिनिटे झाल्यानंतर नागरिकांनी आवाज देण्यास सुरूवात केली. त्यानंतर चालक आपल्या जागेवरून उठून चालकसिटवर येऊन बसला. वाहकाने डबल बेल मारल्यानंतर गाडी मार्गस्थ झाली. बसमध्ये 29 प्रवासी होते. वाहकची वर्तवणुक प्रवासावेळी संयमी सहकार्याची असल