Fri, Mar 22, 2019 23:51होमपेज › Pune › पुणे : कोथरूड बस डेपोत बस पेटली 

पुणे : कोथरूड बस डेपोत बस पेटली 

Published On: Dec 16 2017 9:57AM | Last Updated: Dec 16 2017 9:57AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

कोथरूड बस डेपोत उभ्या असलेल्या बसने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. डेपोतील कर्मचाऱ्यांनी वाळू, माती आणि अग्नीशमन साधनांचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळात अग्निशमन दलाचे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली. बस पेटली तेथे जवळच एमएनजीएलचे स्टेशन आहे. मात्र, आग लवकर आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे कारण समजू शकले नाही.