Wed, Jan 23, 2019 08:46होमपेज › Pune › बैलगाडा शर्यत बंदी : आज पुण्यात आंदोलन

बैलगाडा शर्यत बंदी : आज पुण्यात आंदोलन

Published On: Mar 13 2018 10:54AM | Last Updated: Mar 13 2018 10:54AMपुणे : प्रतिनिधी

बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्याप्रकरणी अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्यच्यावतीने बेमुदत राज्यव्यापी आंदोलनाला सकाळी ११ वाजता प्रारंभ होत आहे. या आंदोलनात अडीचशे बैल जोड्यांसह मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होणार आहेत. या आंदोलनासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बैलगाडा शर्यतीवर बंदीविरोधाच्या दुट्टपी भूमिका असलेल्या पेटा संस्थेचा निषेध केला जाणार आहे. 

आंबेगाव, खेड, जुन्नर यासह जिल्ह्यातील बैलगाडा स्पर्धाप्रेमी या मोर्चेत सहभागी होणार आहेत.