Mon, Apr 22, 2019 04:22होमपेज › Pune › बुलेटची फटाका सवारी आरटीओपर्यंत पोहचणार का?

बुलेटची फटाका सवारी आरटीओपर्यंत पोहचणार का?

Published On: Jun 25 2018 1:52AM | Last Updated: Jun 25 2018 12:38AMपुणे : नवनाथ शिंदे

शहरात मॉडीफाईड बुलेट फडाकड्यांच्या आवाजमुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः महाविद्यालयांच्या परिसरात बुलेट बहाद्दर सायलन्सद्वारे मोठमोठ्याने आवाज काढत ध्वनिप्रदुषणात वाढ करत आहेत. प्रामुख्याने डेक्कन, स्वारगेट, जंगली महाराज रस्ता, कर्वेनगर, कोथरुड, मांजरी, हडपसर परिसरात हा प्रकार दिसतो आहे..

मोटार वाहन कायद्यानुसार वाहनात बदल करावयाच्या असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, केवळ फॅशनसाठी या बुलेटधारकांकडून गाड्यांमध्ये बदल केला जातो.

सायलेन्सर आणि हातातील बटण सलग दाबून फटाक्यासारखा आवाज काढला जातो. प्रामुख्याने दुसर्‍या चालकाचे लक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी असे आवाज काढले जात आहेत. त्यामुळे अचानकपणे कानावर पडलेल्या आवाजामुळे शेजारुन जाणार्‍या दुचाकीस्वारांचे लक्ष विचलित होते. या प्रकारांमुळे वाहनावरील नियत्रंण सुटून अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. विशेषतः महाविद्यालय परिसरात बुलेटस्वारांचा ताफा सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास आवाज काढत मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरवत असल्याचे आढळून आले आहे.

फॅशन आणि के्रझ जपण्यासाठी बुलेटस्वारांकडून आवाजासाठी  खासपद्धतीने हॉर्नची रचना केली जाते. त्यासाठी स्टार्टर बटण आणि गाडीचे स्वीच सलग बंद चालू करत फटाक्यांसारखे आवाज काढले जात आहेत. त्यामुळे ग्रुपमध्ये एकत्रित बुलेटवर प्रवास करुन महाविद्यालयीन तरुणींसह नागरिकांना वेठीस धरणार्‍या या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.