Sun, May 31, 2020 18:04होमपेज › Pune › शहा यांचा खून करणारे ओळखीतले

शहा यांचा खून करणारे ओळखीतले

Published On: Jan 16 2018 2:15AM | Last Updated: Jan 16 2018 1:38AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

 घरातून खाली बोलवून बिल्डर देवेंद्र शहा यांची गोळ्या झाडून हत्या करणारे दोघे त्यांच्या ओळखीतील असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना दोघांची ओळख पटविण्यात यश आले आहे. मात्र, अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. 

या दोघांच्याही मागावर पोलिसांची पथके आहेत. पैशाच्या वादातून हा खून केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. 

रवी चोरगे आणि राहुल शिवतारे (रा. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही पोलिस रेकॉर्डवरील असून, त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. बिल्डर शहा यांची शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यावेळी शहा यांचा मुलगा अतित आणि सुरक्षा रक्षकही तेथे होता. तसेच, पोलिसांना या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले होते. यामध्ये हल्ला करणार्‍या व्यक्ती स्पष्ट दिसत होत्या. त्या फुटेजवरून पोलिसांनी रेखाचित्रे तयार केली. तसेच, फुटेजमधील चेहरे ओळखण्यासाठी फुटेज वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात आले होते. त्यानंतर हल्ला करणारे दोघेजण चोरगे आणि शिवतारे असल्याचे समोर आले आहे. चोरगे याच्यावर शस्त्राने हल्ला केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. तर, शिनगारे याच्यावर एक खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून त्यांची ओळख पटविण्यात आली आहे. व्यवहारातील कमिशनमधील पैशाच्या वादातून त्यांनी हा खून केल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. सीसीटीव्हीवरून दोन आरोपींची ओळख पटविण्यात आली आहे. त्यांच्या मागावर स्थानिक पोलिस तसेच गुन्हे शाखेची पथके आहेत. दरम्यान, दोघांची ओळख पटविली असली तरी त्यांचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही.