Wed, Aug 21, 2019 15:06होमपेज › Pune › वास्तवदर्शी मर्यादा जपणारा अर्थसंकल्प : अभय टिळक 

वास्तवदर्शी मर्यादा जपणारा अर्थसंकल्प : अभय टिळक 

Published On: Feb 01 2018 7:48PM | Last Updated: Feb 01 2018 7:48PMपुणे : पुढारी ऑनलाईन

 केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा वास्तवदर्शी असल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांनी व्यक्त केले आहे. आगामी काळातील निवडणुका, वेगवेगळ्या क्षेत्रातील उंचावलेल्या अपेक्षा, महसूलाची नाजूक परिस्थिती, तूट आटोक्यात राखण्याचे निर्माण झालेले आव्हान आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी करावी लागणाऱ्या कसरतीचे भान ठेवून अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला, अशा शब्दांत टिळक यांनी अर्थसंकल्पाने अपेक्षा पूर्ण केल्याचे सांगितले. 

ते म्हणाले की, नुकत्याच तीन राज्यात पार पडलेल्या निवडणुका आणि गुजरातमधील निकाल याशिवाय उदारिकरणानंतर 26 ते 27 वर्षांपासून शेतीच्या केविलवाणी परिस्थितीमुळे यंदाचा अर्थसंकल्प शेती संलग्न असावा, अशी अटकल होती. याशिवाय नोटा बंदी आणि वस्तू आणि सेवा कर या मुद्यामुळे महसूल खर्च नियंत्रित ठेवण्याचे आव्हान देखील निर्माण झाले होते. सत्ताधारी भाजपचा आधारस्तंभ असणाऱ्या मध्यम वर्गांकडून देखील अर्थसंकल्पाला अपेक्षा होत्या. सरकारने कोणतीही चमकदार घोषबाजी न करता सर्व वर्गाला अर्थसंकल्पात न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे दिसते, असे मत टिळक यांनी मांडले.  यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधींच्या वेतनवाढीचे देखील समर्थन केले.