Tue, Jul 16, 2019 21:46होमपेज › Pune › सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याची तज्ज्ञांची प्रतिक्रिया (Video)

सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याची तज्ज्ञांची प्रतिक्रिया (Video)

Published On: Feb 01 2018 11:55PM | Last Updated: Feb 01 2018 8:39PMपुणे : प्रतिनिधी

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याच्या प्रतिक्रिया विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिल्या.

आरोग्यविमा , पर्यटनाला चालना देणाऱ्या योजना, ग्रामीण विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे मराठा चेम्बर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज एंड एग्रीकल्चर ,पुणेचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी म्हटले. तसेच खजिनदार चंद्रशेखर चितळे यांनी दिर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे करदात्यांना धक्का बसला असल्याचे सांगितले.

निवडणुकांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर न ठेवता सादर केलेला हा अर्थसंकल्प आहे. करसवलती देणे हा अर्थसंकल्पाचा उद्देश नसतो. जीएसटीनंतर करदात्यांमध्ये झालेली वाढ उल्लेखनीय आहे. आयकरात दिलेल्या तरतुदींमध्ये अन्न, वस्त्र निवारा या गोष्टींचा विचार केला आहे. मात्र, घर खरेदी विक्रीमध्ये काही कर सवलती दिल्या असत्या तर घरविक्रीला चालना मिळाली असती असे मत करसल्लागार महेश भागवत यांनी व्यक्त केले.

याबरोबरच प्रकाश पटवर्धन, महेश भागवत, संदिप मुखर्जी (मुख्य वित्त अधिकारी , डेलाईट), अनिल पटवर्धन (मुख्य वित्त अधिकारी, केपीआयटी टेक्नॉलॉजिस), ज्योत्सना शर्मा (मुख्य वित्त अधिकारी, सॅन्डविक आशिया), नरेंद्र सोनवणे (अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटना) यांनीही अर्थसंकल्पावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या.