Sat, Aug 24, 2019 23:28होमपेज › Pune › अर्थसंकल्पातील आरोग्य योजना जगात भारी : धनंजय चिंचवडकर

अर्थसंकल्पातील आरोग्य योजना जगात भारी : धनंजय चिंचवडकर

Published On: Feb 01 2018 6:31PM | Last Updated: Feb 01 2018 6:20PMपुुणे : पुढारी ऑनलाईन

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचे मत कर सल्लागार  धनंजय चिंचवडकर यांनी व्यक्त केले आहे. सरकारने शेती, आरोग्य, शिक्षण, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पगारदार वर्ग या सर्वांचाच सकारात्मक विचार करुन अर्थसंकल्प मांडला आहे.  

आरोग्य क्षेत्रात 10 कोटी गरिब कुटुंबियांना दिलेले सुरक्षा कवच हा अर्थसंकल्पातील ऐतिहासिक निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य विमा योजनेबद्दल ते म्हणाले की, प्रतिवर्ष 5 कोटीप्रमाणे  अंदाजे 50 कोटी आरोग्य विमा योजनेची तरतूद ऐतिहासिक आणि जगातील पहिली योजना असल्याचा उल्लेख त्यांनी केला. सध्याच्या घडीला अनेक देशात सोशल सिक्युरिटी स्किम या नावाने ही योजना राबवली जाते. मात्र, या सुविधेचा लाभ देणाऱ्या देशात  35 ते 40 टक्के आयकर आकारला जातो.  

 

यंदाच्या अर्थसंकल्पात करामध्ये कोणताही बदल न करता ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे वाटते. याशिवाय सर्व क्षेत्रांमध्ये अधिकाधिक सुधारणा घडवून आणू शकणारा आणि आधुनिक भारताच्या जडण घडणीत मोठा हातभार लावणारा अर्थसंकल्प असल्य़ाचेही त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे शेतीचा अधिकाधिक विकास होईल. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प साध्य होईल, असे चिंचवडकरांनी म्हटले आहे.