कोरोनाला रोखण्यासाठी पंचसूत्री कृतीत आणा

Last Updated: Mar 30 2020 12:29AM
Responsive image


पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून मार्गदर्शक तत्त्वे  वेळोवेळी जारी केली जातात. त्यानुसारच केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी कशी काळजी घ्यावी, काय उपाययोजना कराव्यात याविषयी सूचना करत आहे. सध्या राज्यासह देशात लॉकडाऊन लागू असूनही नागरिक रस्त्यावर येत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने 20 पानांची पंचसूत्री प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार सर्वांनी कृती केल्यास कोरोनावर पूर्णपणे मात केली जाऊ शकते, असा विश्‍वास त्यात व्यक्‍त केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्त्वे पाळा आरोग्य विभागाचे राज्यातील नागरिकांना आवाहन 

काय आहे कोरोना

नवीन कोरोना विषाणू आजाराला कोविड -19 असे म्हणतात. ताप, कोरडा खोकला आणि श्‍वास घ्यायला त्रास होणे ही कोरोनाची लक्षणे आहेत. अशी लक्षणे असतील तर त्याची चाचणी करणे आवश्यक आहे. कोरोनाचे निदान झालेल्या व्यक्‍तीच्या संपर्कात आला असाल तर राज्य नियंत्रण कक्षाशी संपर्क करा - 020- 26127394  किंवा शंका समाधानासाठी 104 या क्रमांकावर संपर्क साधा

आपल्याबरोबर इतरांचीही काळजी घ्या

घरात विलगीकरणात राहण्याचा सल्‍ला डॉक्टरांनी दिला असल्यास त्याचे तंतोतंत पालन करा. वेगळ्या खोलीत राहा. घरातील इतर लोकांशी कमीत-कमी एक मीटर अंतर ठेवून संवाद साधा. ताप, कोरडा खोकला किंवा श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यास मास्कचा वापर करा, तसेच आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क करून माहिती द्या. रुग्णाची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी औषधोपचार आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा. 

असा करा संरक्षणात्मक बचाव

बाधित रुग्णासह घरातील डिश, पाणी पिण्याचे ग्लास, कप, भांडी, टॉवेल्स यासारख्या वस्तू शेअर करू नका, वापरलेले टिश्यू पेपर बंद कचरापेटीत फेकून द्या, ऊबदार पाण्यात कपडे धुऊन निर्जंतुक करून घ्या, वॉशिंग मशिन, जंतुनाशक, साबण, कोमट पाण्याचा वापर करा. वारंवार हात लावण्यात येणारे पृष्ठभाग जसे की, काउंटर, टेबल टॉप, डोअरनॉब, बाथरूम, टॉयलेट्स, फोन, की-बोर्ड, गोळ्यांचे पाकीट स्वच्छ आणि निर्जंतुक करा.

असा करा मास्कचा वापर

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मॉस्कचा वापर केला जात आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार आपल्याला कोरोनाची लक्षणे आसल्यास, आरोग्य केंद्रास भेट देताना किंवा एखाद्या आजारी व्यक्‍तीची भेट घेत असाल तरच मॉस्कचा वापर करावा.  वापरलेल्या मॉस्कची विल्हेवाट कशी लावावी, याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. मास्क काढल्यानंतर किंवा जेव्हा आपण अनवधानाने त्याला स्पर्श करतो तेव्हा त्वरित हात साबण व पाण्याने धुवावे. तसेच एकदा वापरणारे मास्क असेल तर ते बंद कचरापेटीत टाका.articleId: "185560", img: "Article image URL", tags: "Bring in a pentagon to prevent the corona",