Wed, Apr 24, 2019 02:09होमपेज › Pune › ब्रेनडेड रूग्णाने दिले चौघांना जीवनदान

ब्रेनडेड रूग्णाने दिले चौघांना जीवनदान

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 12 2018 12:12AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

डेक्कनच्या सह्याद्री रुग्णालयात ‘सुबाराकस्नॉईड हॅमरेज’ या आजाराने ग्रस्त असलेल्या 50 वर्षीय रुग्ण उपचारादरम्यान ब्रेन डेड झाला. त्याच्या नातेवाईकांनी केलेल्या अवयवदानामुळे चार जणांना जीवनदान मिळाले आहे. 

या रुग्णाचे यकृत सह्याद्रीमधील ‘लिव्हर सिरॉसिस’ या आजाराने ग्रस्त असलेल्या 32 वर्षीय रूग्णावर तर मूत्रपिंड 57 वर्षीय महिलेवर प्रत्यारोपित करण्यात आले. दुसरे मूत्रपिंड नाशिक येथील रुग्णालयात व डोळे पुण्यातील एका रुग्णाला दान करण्यात आले. 

याबाबत बोलताना सह्याद्री हॉस्पिटलमधील यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ व हेपॅटोबिलियरी सर्जन डॉ.बिपीन विभुते म्हणाले की, हा 50 वर्षीय रूग्ण एका खाजगी कंपनीत कार्यरत होता. डिसेंबरमध्ये त्याला अ‍ॅडमिट करण्यात आले होते.