Sun, Jan 19, 2020 16:46होमपेज › Pune › सीमा भिंत कोसळली; वाहनांचे प्रचंड नुकसान

सीमा भिंत कोसळली; वाहनांचे प्रचंड नुकसान

Published On: Jul 20 2019 2:12PM | Last Updated: Jul 20 2019 2:12PM
येरवडा : वार्ताहर

वडगावशेरी येथील करण घरोंदा या सोसायटीची सीमा भिंत रात्री झालेल्या प्रचंड पावसाने कोसळली. यामध्ये ८ दुचाकी व १ चारचाकीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

पुणे शहरात कोंढवा, आंबेगाव येथील सोसायटीची सीमा भिंत कोसळण्याची घटना ताजी असतानाच आता वडगावशेरीतील सोसायटीची भिंत पडल्याने शहरातील पुन्हा एकदा भिंतीच्या बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.