Thu, Apr 25, 2019 03:32होमपेज › Pune › वेगवान असलेल्या दोन दुचाकीच्या धडकेत दोघे ठार

वेगवान असलेल्या दोन दुचाकीच्या धडकेत दोघे ठार

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 1:51AMपुणे : भरधाव वेगातील दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी आहेत.  ही घटना एमआयबीएम रस्त्यावरून कडनगरकडे जाताना रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. संजिव सिंग जसवंत सिंग ( 24), प्रल्हाद सिंग कर्नल सिंग (40, दोघे रा. कुमार पाल्म, लेंबर वॅम्प, ऊंड्री रस्ता, मुळ रा. जम्मू कश्मीर)  यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. रेहान रिझवान कॉन्ट्रॅक्टर (21, रा. कोणार्वै पुरम, कोंढवा) आणि त्याचा मित्र जिया इकबाल हबीब ( 20) या दोघांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहान कॉन्ट्रॅक्टर याने आझम कॅम्पसमधून बारावीची परिक्षा दिली आहे. तर जिया हबीब हा वाडीया महाविद्यालयात 12 वीत शिकत आहे. रेहान हा त्याच्या केएमटी दुचाकीवरून जिया हबीब याला सोबत घेऊन कडनगरकडून एनआयबीएम रस्त्याकडे भरधाव वेगात येत होता. त्याचवेळी कुमार पल्म्स लेबर कॅम्प येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाारे संजिव सिंग आणि प्रल्हाद सिंग हे दोघे स्प्लेंडरवरून साईटवर निघाले होते. कॉन्ट्रॅक्टरची भरधाव दुचाकी समोरून येणार्‍या स्प्लेंडरवर जोरात आदळून मोठा अपघात झाला. या दोन्ही दुचाकींवरील चौघेही रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये संजीव सिंग व प्रल्हाद सिंग यांचा मृत्यू झाला  कॉन्ट्रॅक्टर आणि हबीबची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.