होमपेज › Pune › बोगस डॉक्टरचा भांडाफोड

बोगस डॉक्टरचा भांडाफोड

Published On: May 14 2018 1:55AM | Last Updated: May 14 2018 12:45AMपिंपरी : प्रतिनिधी 

वैद्यकीय शिक्षण नसताना, कोणतीही पदवी न घेता ‘मूळव्याध उपचार दवाखाना’ चालवणार्‍या  बोगस डॉक्टराचा भांडाफोड महापालिकेच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी केला आहे. तसेच बोगस दवाखाना चालवून रुग्णांना लुटणार्या बोगस डॉक्टरवर वाकड पोलिस ठाण्यात शनिवारी (दि 12) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तरवील संगीता तीरुमनी यांनी फिर्याद दिलेली आहे. तर संदीप विश्वास (रा.  नढे नगर, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यानंतर बोगस डॉक्टरने आपले पळ काढला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप विश्वास हा काळेवाडी येथील तापकीर चौकात मूळव्याध उपचार दवाखाना या नावाने क्लिनिक चालवात होता. मात्र त्याने डॉक्टरकीचे कुठलेही वैद्यकीय शिक्षण घेतले नसून त्याच्याकडे वैद्यकीय शिक्षणाचे प्रमाणपत्र नसल्याचे लक्षात आले. याची माहिती मिळताच महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या अधिकारी डॉ. तरवील यांनी या रुग्णालयाची झाडाझडती घेतली आणि वाकड पोलिसांकडे  फिर्याद दाखल केली. त्यानुसार महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीसनर अक्त 1961 (33) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वाकड पोलिस करत आहेत.