होमपेज › Pune › नोकरीसाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून बोगस विमा एजन्सी

नोकरीसाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून बोगस विमा एजन्सी

Published On: Dec 08 2017 1:41AM | Last Updated: Dec 08 2017 1:19AM

बुकमार्क करा

पुणे प्रतिनिधी 

तरुणाची बनावट कागदपत्रे तयार करून त्यांचा वापर करत तब्बल वीस वर्षे बोगस विमा एजन्सी चालवत या एजन्सीचे येणारे कमिशन बोगस खात्याद्वारे घेत लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून याप्रकरणाचा तपास सुरु आाहे.  

प्रशांत गांधी यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. प्रशांत गांधी हे मुळचे नगर जिल्ह्यातील राहणारे आहेत. त्यांना त्यांच्या वडिलांच्या ओळखीचे न्यू इंडीया इंश्यूरन्स कंपनीच्या एका अधिकार्‍याने काही वर्षांपूर्वी कंपनीत नोकरी लावतो असे सांगितले. त्यानंतर नोकरी लावण्यासाठी त्यांची शैक्षणिक व इतर कागदपत्रे घेतली. काही  अर्जांवर त्यांची स्वाक्षरी घेतली. त्यांना नोकरी काही मिळाली नाही. मात्र 2015 मध्ये त्यांच्या पॅनकार्डवर टीडीएसची नोंद झाल्याचे त्यांच्या भावाच्या लक्षात आले. त्याबाबत चौकशी केल्यावर ते टीडीएस न्यू इंडीया इंश्यूरन्स कंपनीच्या कमिशनपोटी ती झाली असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी याबाबत न्यू इंडीया इंश्यूरन्स कंपनीच्या नगर येथील शाखेत चौकशी केली. त्यावेळी  पुण्यात लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकीजजवळ प्रशांत गांधी यांच्या नावे एजन्सी सुरू असल्याचे  सांगण्यात आले. 

त्यानंतर त्यांनी या एजन्सीशी त्यांचा काही संबंध नाही असे सांगितल्यावर ही एजन्सी बंद करण्यासंदर्भात तेथील मॅनेजरने ईमेल केला. मात्र गांधी यांनी पुन्हा या प्रकरणाचा पाठपुरावा केला. मात्र तेथे त्यांना नीट प्रतिसाद दिला गेला नाही. त्यानंतर त्यांनी पुन्हा पाठपुरावा केल्यावर त्यांच्या नावाने सुरु केलेली एजन्सी ही एका बनावट पॅनकार्डचा वापर करून एजंन्सी सुरू केल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांचे चालू पॅनकार्ड वापरण्यात आले. अशी माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे त्यांनी आयआरडीएआयशी संपर्क साधून मला माहिती दिली गेली नाही. अशी तक्रार केली.

याप्रकरणी त्यांनी अनेकदा तक्रारी केल्या. कंपनीने त्यानंतर प्रकरणाच्या तपासासाठी इव्हीस्टीगेटर नेमण्यात आला. हा प्रकार समोर आल्यानंतर मार्च 2016 पर्यंत गांधी यांच्या नावाने पॅनकार्डवर टीडीएस जमा होत राहिले. तर संबंधित अधिकार्‍याने प्रशांत गांधी यांची बनावट सही करून आणि बनावट कागदपत्रे वापरून स्टेट बँक ऑफ इंडीयामध्येही एक संयुक्त खाते उघडले असून त्यात विम्याचे कमिशन जमा होत असल्याचा प्रकार समोर आला. त्या खात्याबाबत चौकशी केल्यावर त्यांच्या या खात्यातून अधिकार्‍याने वेळोवेळी एटीएमद्वारे पैसे काढल्याचे पुरावे गांधी यांच्याकडे आहेत. त्यानंतर याप्रकरणाची तक्रार गांधी यांनी पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती कार्यालय यांच्याकडेही तक्रार केली. असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात कागदपत्रांचा गैरवापर करून अधिकार्‍यांनी संगनमताने मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवाहर केला आहे. असा आरोप प्रशांत गांधी यांनी केला आहे.