Thu, Nov 15, 2018 01:05होमपेज › Pune › महिला शिक्षकाकडे शरीरसुखाची मागणी

महिला शिक्षकाकडे शरीरसुखाची मागणी

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 08 2018 12:38AMपिंपरी : प्रतिनिधी 

नोकरी टिकविण्यासाठी शाळा समिती अध्यक्षाने शिक्षक महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. हा प्रकार पिंपरी येथील भारतीय जैन संघटना शाळेत घडला. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शिक्षक महिलेने फिर्याद दिली असून त्यावरून शाळा समिती अध्यक्ष अरुण नहार (वय 50) याच्यासह एस.डी. कदम (वय 52) बी.बी. चौगुले (वय 63) आणि श्री. कोचर (वय 55) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जैन संघटनेच्या शाळेत शाळा समिती अध्यक्षाची काही महिन्यांपूर्वी निवड झाली. नवनिर्वाचित अध्यक्ष नहार याने एका शिक्षक महिलेकडे नोकरी टिकवसाठी शरीरसुखाची मागणी केली. यामध्ये शाळेतील काही कर्मचारी आणि शिक्षकांनी नहारला साथ दिली. शिक्षिकेने नहारला नकार दिल्याने त्याने अश्‍लील बोलून तिचा विनयभंग केला. नहारने शिक्षिकेस वेगळ्या कारणाने नोकरीवरून काढून टाकले असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला जात आहे.