होमपेज › Pune › अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

Published On: Jun 01 2018 2:11AM | Last Updated: May 31 2018 11:50PMशहरात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांना विविध संस्था, संघटना तसेच राजकीय संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अहिल्यादेवींच्या कार्याला उजाळा देण्यात आला; तसेच विविध ठिकाणी जनजागृती करण्यात आली. 

वायसीएम रुग्णालय

संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज देशमुख ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.  यावेळी डॉ. दिनेश गाडेकर, रुग्णालयाच्या मेट्रन आदी उपस्थित होते. बालरोग आंतररुग्ण विभागात मुलांना खेळण्यासाठी खेळणी भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रभा दुर्गे, गणेश एकळ, आशुतोष मरळे, तानाजी गवंड आदींनी परीश्रम घेतले. आभार डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी मानले.

अंजठानगर प्रतिष्ठान

पिंपरी ः चिंचवड अजंठानगर पुण्यश्‍लोक प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पिंपरी मोरवाडी चौक येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुण्यश्लोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास महानवर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अशोक उकले, भाऊ उगडे, अशोक ठोंबरे, सचिन कोळेकर, औंदुबर सरक, राजू मारकड आदी उपस्थित होते.  विलास महानवर यांनी, ‘अहिल्याबाई होळकर या योग्य न्यायदानासाठी सुप्रसिध्द होत्या.अहिल्यादेवींनी भारतभर विविध हिंदू मंदिरे व नदीघाटांची निर्मिती केली. त्यांचा जीर्णोद्धारही केला. महेश्वर व इंदूर हि गावे तर त्यांच्यामुळेच सुंदर बनलीत. अनेक देवळांच्या त्या आश्रयदात्या होत्या. अहिल्याबाई उत्तम शासक व संघटक होत्या अशा शब्दांत त्यांचा जीवनकार्याचा गौरव केला.

छावा संघटना

पिंपरी : छावा संघटनेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर चौक येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र सल्लागार मच्छिंद्र चिंचोळे यांनी उपस्थितांना अहिल्यादेवींचा इतिहास सांगितला. कार्यक्रमाचे नियोजन संघटनेचे कार्याध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाला शहराध्यक्ष नानासाहेब बालघरे, मोहन सगर, संदिप डाके आदी उपस्थित होते.