Thu, Aug 22, 2019 13:12होमपेज › Pune › ‘कट’ लागल्याचा वाद घालत तरुणाला लुटले

‘कट’ लागल्याचा वाद घालत तरुणाला लुटले

Published On: Dec 12 2017 9:55AM | Last Updated: Dec 12 2017 9:55AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

विरुद्ध दिशेने दुचाकीवर आलेल्या दोघांनी तरुणाला गाडीचा कट मारल्यावरून वाद घालत जबरदस्तीने रोकड आणि मोबाईल लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार बेलबाग चौकात घडला. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जिग्नेश पटेल (वय 27, रा.लष्कर) या तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला

फिर्यादी जिग्नेश पटेल हा लष्कर परिसरात राहण्यास आहे. तो शनिवार रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याच्या चुलत भावासोबत दुचाकीवर बेलबाग चौकातून लक्ष्मीरोडने जोगेश्वरी गल्लीत कामानिमित्त येत होता. त्यावेळी बेल बाग चौकापुढील डक बँक सिझनल हाऊस एस-125 समोर विरुद्ध दिशेने आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळ येऊन गाडीला का कट मारला असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. फिर्यादीला तेथे थांबण्यास भाग पाडून त्याला गाडीवरून उतरवले. तसेच, फिर्यादी व चुलत भावाला अंधारात नेले. जबरदस्तीने खिशातील 3 हजाराची रोकड आणि दोन मोबाईल असा एकूण 63 हजार रुपयांचा माल चोरून नेला. फिर्यादी यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी अधिक तपास फरासखाना पोलिस करीत आहेत.