Tue, Jul 16, 2019 13:59होमपेज › Pune › हो..सायकल चालविताना असुक्षित वाटते..!

हो..सायकल चालविताना असुक्षित वाटते..!

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 17 2018 12:57AMपुणे : प्रतिनिधी

सायकलचे शहर म्हणून ख्याती असणार्‍या पुण्यात सायकलचालकांचा आदर केला जात नाही, वाहनचालकांकडून हुसकावूनच लावले जाते, हक्काच्या सायकल ट्रॅकवरही अक्रिमण झाले आहे, याची कुणाला खेद ना खंत, अशी व्यथा सायकलचालक आणि ग्रुपच्या प्रतिनिधींनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली.

महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांचा नऊ वर्षांचा मुलगा अंजनेय हा सायकलिंग करण्यासाठी गेला असता त्याला दुचाकीस्वाराने धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला पण, त्याला रुग्णालयात नेण्यासाठी रस्त्यावरील वाहनचालकांकडे आयुक्तांनाच दहा ते बारा मिनिटे विनवणी करावी लागली. या पार्श्‍वभूमीवर पुण्यात सायकलचालक सुरक्षित आहेत का, याचा ‘पुढारी’ने आढावा घेतला असता सायकलचालकांनी नाराजी व्यक्त केली.

डॉ. अमृता डोईफोडे म्हणाल्या, शहरात काही ठिकाणीच सायकल चालविणे सुरक्षित आहे. सायकल चालकांचा आदर केला जात नाही. संपूर्ण शहरात सायकलट्रॅक नाहीत आणि जिथे आहेत तेथे अतिक्रमणे झाली आहेत. महापालिकेचे सायकल धोरण चांगले आहे, पण याची योग्य अंमलबजावणी होण्याची गरज आहे.

राजेश पांडे म्हणाले,  काही ठिकाणी सायकल ट्रॅक असूनही त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. सायकल दुरुस्तीसाठी दुकानांची संख्या कमी झाली आहे. 

अ‍ॅड. अनिकेत कदम म्हणाले, मागील दोन ते तीन वर्षांपासून सायकल प्रवास करत आहे. मात्र, सायकल धोरणाची अंमलबाजावणीच होत नसल्याने मनस्ताप होतो. भाग्यश्री नागतुरे म्हणाल्या, शहरात सायकल चालिवणे अवघड आहे. दुचाकीस्वार ओव्हरेटक करताना भिती वाटते. अपघातात कोणी जखमी झाल्यास लगेच मदत मिळेल याची शाश्‍वती नाही. सरकाने सायकल धोरणाची कडक अंमलबजावणी केल्यास सायकलीचे शहर म्हणून पुणे शहर पुन्हा नावारुपास येईल.

सुमेर वर्मा म्हणाले, प्रदूषण टाळ्यासाठी सायकल चालविण्याचा सल्ला दिला जातो पण, सायकलचालकांना सन्मानच मिळत नाही.  हॉर्न वाजवून सायकलचालकांना हुसकावून लावले जाते. 
किंमत आणि दुरुस्ती कमी आणिएन्व्हायरमेंट फ्रेंडली सायकल फॉर पुणे या ग्रूपचे अनंतकुमार मालिकाविटील म्हणाले, आम्ही आमच्या ग्रुपसोबत कायमच सायकल चालवित असतो. तसेच जनजागृतीही करतो. मात्र, त्याचा फायदा कोणी फारसा घेत नाही. खरे तर सायकल वापरणे म्हणजे कॉस्ट कमी, मेन्टनन्स, एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. पण रस्त्यावर सायकल स्वारांना मिळणार्‍या बागणुकीमुळे सायकलकडे वळणार्‍यांची संख्या कमी आहे.

बिटविन एव्हीएटर सायकल ग्रूपचे मानस जोशी म्हणाले, आमचा सायकलचालकांचा ग्रुप आहे. आम्ही ग्रुपच्या माध्यमातून सायकलच्या फायद्यांसदर्भात रस्त्यावर उभे राहून नागरिकांमध्ये जनजागृती करतो. मात्र, आजचे जग  सायकलस्वारांसाठी असुरक्षित असल्याचेच नुकत्याच झालेल्या घटनेवरून समोर येते आहे..

पुणे सायकल प्रतिष्ठानचे जुगल राठी म्हणाले, 1998 साली आम्ही ग्रुप बनविला होता. आता या ग्रुपला 20 वर्ष झाली आहेत. महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्ही सायकल प्रचार फेरी काढतो. याद्वारे आम्ही सायकलचे फायदे लोकांना सांगत असतो. एवढे जनजागरण केल्यानंतरही फारसा प्रतिसाद मिळत नाही, उलट सायकलस्वारांना मिळणार्‍या वागणुकीमुळे नागरिक सायकलच्या वौेला जात नसल्याचे दिसते.