होमपेज › Pune › ‘जीएसटी’मुळे लघुउद्योजक मेटाकुटीला

‘जीएसटी’मुळे लघुउद्योजक मेटाकुटीला

Published On: Dec 03 2017 1:44AM | Last Updated: Dec 03 2017 12:43AM

बुकमार्क करा

भोसरी :विजय जगदाळे 

गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच जीएसटी कर प्रणाली लागू झाल्यापासून अनेक लघुउद्योजक मेटाकुटीला आले आहेत. दर महिन्याला रिटर्न्स भरावे लागत असल्याने उद्योजकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 90 ते 120 दिवस पेमेंटसाठी लागत असल्याने  उद्योजकांवर शॉप बंद करण्याची वेळ आली आहे. जीएसटी कर प्रणाली लागू झाल्यापासून लघुउद्योजक हैराण झाले आहेत. दर महिन्याच्या ठराविक कालावधीमध्येच रिटर्न्स फाईल करावे लागत आहे. वेळेत रिटर्न्स फाईल झाले नाही तर दंड आकाराला जातो. जीएसटी करप्रणालीचे कामकाज पाहण्यासाठी अतिरिक्त कामगार भरावे लागत असल्याचे उद्योजक सांगतात.

जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणात कामकाज कमी झाले आहे. एखाद्या कंपनीला माल दिल्यानंतर त्यांच्याकडून पेमेंट मिळण्यासाठी लागणारा कालावधी 60 ते 90 दिवस आहे. या दरम्यान लघु उद्योजकाला दर महिन्याला कामगारांचा पगार, कच्चा माल घेण्यासाठी लागणारे मुद्दल आदींसाठी पैसे लागत असतात; परंतु माल विकत घेणार्‍यांकडून पैसे मिळण्यास दोन ते तीन महिन्यांचा वेळ लागत आहे. त्यामुळे अनेक लघुउद्योजकांनी हातउसने पैसे किंवा बँकेच्या सीसीचा वापर करीत आपला व्यवसाय सुरू ठेवला आहे. त्यामुळे लघुउद्योजकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासाठी लागणारा पैसा आणायचा कोठून, असा प्रश्‍न उद्योजकांना पडला आहे. काही उद्योजक आपला व्यापार सोडून पुन्हा कामाला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.