Mon, May 20, 2019 22:32होमपेज › Pune › भोसरीतील शिवसृष्टीकडे पालिकेचे दुर्लक्ष

भोसरीतील शिवसृष्टीकडे पालिकेचे दुर्लक्ष

Published On: Feb 05 2018 9:47AM | Last Updated: Feb 05 2018 1:20AMभोसरी :विजय जगदाळे

महापालिकेच्या वतीने भोसरी येथे शिवसृष्टी अभारण्यात आली आहे. परंतु पालिका प्रशासनाचा उदासीनतामुळे शिवसृष्टीची दुरवस्था झाली आहे. अनेक शिल्पांची रंग उडाले आहेत. ठिकठिकाणी पक्षांची विष्ठा शिल्पावर पडलेली दिसते. तसेच अनेक दिवस शिवसृष्टी न धुतल्याने सर्व शिल्पावर धूळ साचलेली आहे. शिवसृष्टीची झालेली दुरवस्थेबाबत पालिकेने ठोस उपयोजना करावेत अशी मागणी शिवप्रेमी व परिसरातील नागरिक करीत आहेत. भोसरी येथील उभारण्यात आलेली शिवसृष्टीचे उद्घाटन राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते झाले होते.  या शिवसृष्टीत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनातील, बाळ शिवाजी जन्म सोहळ्या पासून ते राज्याभिषेका पर्यंतचे पंचवीस महत्वाचे प्रसंग आकर्षकरित्या शिल्पा मध्ये उभारण्यात आले आहे.

त्यात  महराजांचीराज्याभिषेका नंतर हत्तीवरून मिरवणूक, सोन्याचा नांगर,  संत तुकाराम महराजांचा कीर्तन सोहळा, महराजांनी उभी केलेली सागरी आरमार, पुरंदरचा तह, हिरकणीचा बुरूज,  आग्रा दरबारातील सुटका, जिजाबाईंची सुवर्णतुला, कर्नाटकावर स्वारी आदी प्रसंग आहेत.  शिवसृष्टी परिसरातील फरश्या उखडले आहेत. शिवसृष्टी पाहण्यास येणार्‍या नागरिकांना या मुळे दुखापत झाले असल्याचे नागरिक सांगतात. तसेच छतावर गवतांचे झुडपे वाढलेली आहेत.

परिसारत नियमित स्वच्छता होत नसल्याने जागोजागी कचरा दिसत आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेल पथदिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी शिवसृष्टी पाहताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या शिवसृष्टीच्या बाजूला बिनधास्तपणे वहाने लावली जात आहेत. अनेक शिल्पांची रंग खराब झाले आहे. परिसरातील अनेक शिल्पांवर पक्ष्यांच्या विष्ठा पडलेली आहे. त्यामुळे त्वरित ती स्वच्छ करावी, अशी मागणी शिवप्रेमी करत आहेत. याबाबत संबधित अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.