Wed, Jul 24, 2019 02:02होमपेज › Pune › बूथ सक्षमीकरणातून भोसरीत भाजप कार्यकर्ते चार्ज

बूथ सक्षमीकरणातून भोसरीत भाजप कार्यकर्ते चार्ज

Published On: Aug 30 2018 1:23AM | Last Updated: Aug 29 2018 11:51PMपिंपरी : संजय शिंदे

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार की वेगवेगळ्या याबाबत सर्वच पक्षांत साक्षंकता आहे; परंतु भारतीय जनता पार्टीकडून मात्र येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने तळागळापर्यंत पक्ष मजबुतीकरणासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून भोसरी विधानसभा मतदारसंघात पंडित दीनदयाळ उपाध्याय बूथ विस्तार योजनेच्या माध्यमातून कार्यकर्ते चार्ज झाले आहेत. 

पक्षाचे सहयोगी आ. महेश लांडगे यांनी बुथ सक्षमीकरणासाठी जातीने लक्ष घातल्याने त्याला बळ मिळाले आहे. त्यामाध्यमातून आ. लांडगे समर्थक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जुन्या-नव्यांना ‘वरवर का होईना’ पण सर्वांना बरोबर घेऊन सक्षमीकरणाला गती दिल्याचे दिसत आहे. 

अपक्ष आ. महेश लांडगे यांनी भाजपाचे सहयोगी सदस्यत्व स्विकारात पालिका निवडणुकीच्या तोंडावर समर्थकांना भाजपात प्रवेश देत कमळ चिन्हावर नगरसेवक केले. त्यामुळे शहरातील भाजपाची ताकद वाढली. पक्षाकडे भाजपाचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप, सहयोगी सदस्य आ. लांडगे, राज्यसभा सदस्य खा. अमर साबळे अशी मोठी ताकद निर्माण झाली. पालिकेवर भाजपाची एक सत्ता निर्माण झाली; मात्र शहरात ज्या प्रमाणात भाजपाची संघटनात्मक ताकद वाढणे आवश्यक होते तसे होत नसल्याची खंत अनेक ज्येष्ठाकडून व्यक्त होत होती.

चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात कमळ चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या मोठी असली तरी ही जगताप आणि लांडगे समर्थक नगरसेवक असे म्हणविण्यात ते धन्यता मानत होते. स्वीकृत सदस्य निवडीवरुन जूना आणि नविन वाद निर्माण होऊन आरोप-प्रत्यारोप झाले. ही भांडणे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री यांच्या दरबारात गेली. त्याठिकाणी जुन्या-नव्यानी एकत्र येऊन काम करण्याचा सल्ला दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. 

त्याअनुषंगाने वरिष्ठाकडून पंडीत दिनदयाळ उपाध्याय बुथ सक्षमीकरण योजनेला बळ देण्याचे आदेश दिल्याचे समजते. बुथ सक्षमीकरणाला गती देण्यासाठी जुने प्रभारी बदलून तीन्ही विधानसभा मतदारसंघात नविन  प्रभारी दिले आहेत. त्याअनुषंगाने भोसरी विधानसभा मतदारसंघात बुथ विस्तार योजनेचे प्रभारी म्हणून भाजपाचे सहयोगी आ. महेश लांडगे यांचीच निवड केल्यामुळे बुथ सक्षमीकरणाला वेग आला असलयाचे दिसत आहे. आ. लांडगे यांनी दिलेल्या आदेशानुसार  लांडगे समर्थक नगरसेवक . पदाधिकारी आणि  जूने पदाधिकारी ही  कामाला लागल्याचे चित्र आहे. त्याअनुषंगाने साडे आकरा प्रभागात पक्षाच्या नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांना बरोबर घेऊने विस्तारकांनी प्रभारींच्या आदेशानुसार शक्तीक्रेंद्रे मजबूत करण्याच्यादृष्टीने जवळपास नव्वद टक्के काम पूर्ण  केले आहे.  

काही ठिकाणी पाक्षांतर्गत गट-तट आहेत तेथे संबंधित पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांना स्वतंत्र भेटून या दुरध्वनीवरुन संवाद साधत आहेत. प्रदेशाच्या आदेशानुसार अंतर्गत वाद बाजूला सारत पक्षाच्या शिस्तीला महत्व देण्यामुळे  शक्तीकेंद्रे मजबुतीकरणाला वेग आला आहे.