Thu, Apr 25, 2019 08:10होमपेज › Pune › तरुणाला दिला एकच लग्न करण्याचा सल्ला (व्हिडिओ)

बिगर लग्नाचा आहेस तर भाजपमध्ये ये : बापट (व्हिडिओ)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

राज्याच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ, जबाबदार मंत्री आणि पुणे या सांस्कृतिक राजधानीचे प्रतिनिधित्व करणारे, पालकत्व सांभाळणारे गिरीश बापट हे कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चत असतात. आज असेच जोशात आलेल्या बापटांची जीभ पुन्हा ऐकदा घसरली आहे. पुण्यातील सेव्हन लव्ह चौक ते वखार महामंडळ चौकादरम्यान बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजनावेळी समोरून मोबाईलवर बोलत जाणारा तरुण दिसला. यावर या त्यांनी तरुणाला माईकवरच हटकत विचारले, 'काय बायकोशी बोलतोस का?' त्यावर त्या तरुणाने त्याचे लग्न झाले नसल्याचे सांगितले. त्यावर बापट ताबडतोब उद्गारले, तू 'बिगर लग्नाचा आहेस तर भाजपमध्ये ये. तुला नोकरी देतो, रोजगार देतो. या विधानाने बापट आता पुन्हा ऐकदा चांगलेच चर्चेत आले आहेत.

एखादे दिवशी फॉर्मात येतात आणि जीभ सैल सोडतात. त्यातून मग विरोधकांना खाद्य मिळते, जनतेत चर्चा होते आणि बापटसाहेबांना सारवासारव करावी लागते... आज (शुक्रवार दि. ३०) बापटसाहेबांनी अशीच श्रोत्यांची करमणूक केली.

झालं असं की, पुण्यातील सेव्हन लव्ह चौक ते वखार महामंडळ चौकादरम्यान बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन बापट यांच्या उपस्थितीत झाले.  त्यानंतर बापट यांचे भाषण सुरू झाले. एवढ्यात त्यांना समोरून मोबाईलवर बोलत जाणारा तरुण दिसला. बापटसाहेबांना त्याची खेचण्याची हुक्की आली. त्यांनी तरुणाला माईकवरच हटकत विचारले, 'काय बायकोशी बोलतोस का?' त्यावर त्या तरुणाने त्याचे लग्न झाले नसल्याचे सांगितले. त्यावर बापट ताबडतोब उद्गारले, तू 'बिगर लग्नाचा आहेस तर भाजपमध्ये ये. तुला नोकरी देतो, रोजगार देतो. मात्र, लग्न एकच कर हं...'यावर तो तरुण मात्र निरुत्तर झाला.

यापुढे जाऊन पुन्हा बापट म्हणाले, 

'राजकारणात पुढे कधी काय होईल, हे माहीत नसतं. उड्डाणपुलाचे भूमिपूजन झालं पण, हे काम पूर्ण झाल्यावर उद्‌घाटनाला मलाच बोलवा. आता एक वर्ष राहिले आहे. होय की नाही माधुरीताई? असा प्रश्न त्यांना आमदार माधुरी मिसाळ यांना यावेळी विचारला. यानिमित्ताने 'एकाच वर्षात सरकार बदलणार', 'हिरवा देठ' अशा बापटांच्या वादग्रस्त वक्तव्यांची उपस्थितांना आठवण झाली.

यावेळी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, भाजप अध्यक्ष योगेश गोगावले नगरसेवक मुरलीधर मोहोळ, स्थानिक नगरसेवक प्रवीण चोरबेले, मानसी देशपांडे, माजी नगरसेविका वंदनाताई भिमाले यांच्यासह इतर बारा नगरसेवक उपस्थित होते.

 

Tags : pune, pune news, Wakhar Mahamandal Chowk, flyover, Girish Bapat, 


  •