Thu, Feb 21, 2019 16:11होमपेज › Pune › मिलिंद एकबोटेंना घरचे जेवण नाहीच

मिलिंद एकबोटेंना घरचे जेवण नाहीच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

 पुणे: प्रतिनिधी

शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे दंगलप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार अटक केलेल्या समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष  मिलिंद रमाकांत एकबोटे (वय 61, रा. शिवाजीनगर) यांची रवानगी केल्यानंतर त्यांनी घरचे जेवण मिळण्याबाबत न्यायालयात दाखल केलेला अर्ज विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी फेटाळून लावला आहे. दि. 1 जानेवारी 2018 रोजी शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी जमले होते. त्यावेळी तेथे दगडफेक, जाळपोळ झाली होती. याप्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यासह अन्य तीन जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकबोटे यांच्या वतीने सुरक्षाआणि घरगुती जेवण मिळावे, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी वेगळ्या बराकीमध्ये ठेवण्याचीही व सोबत  दोन सुरक्षा रक्षक देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. कारागृह अधिकारी, फिर्यादी आणि तपास अधिकारी यांनी याप्रकरणी अर्जाला विरोध करताना त्याचे म्हणणे मांडले. कारागृह अधिकार्‍यांनी त्यांचे
म्हणणे मांडताना सांगितले, कारागृह प्रशासनाकडून बंदीवानांना चांगला आहार दिला जात आहे.

एकबोटेंचा घरचे जेवण देण्यासंदर्भातील अर्ज मान्य केल्यास इतर कैद्यांमध्ये योग्य संदेश जाणार नाही. अन्नाची विविध पातळीवर तपासणी करून अन्न पुरविल्यास हरकत नसल्याचा अर्ज  फिर्यादीच्या वतीने न्यायालयात देण्यात आला. न्यायालयाने युक्‍तीवाद ऐकला. एकबोटेंना यापूर्वीच योग्य ती सुरक्षा पुरविण्यात आली असल्याचे  नमूद करताना एकबोटेंचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.  


Tagas : Bhima Koregaon violence, prime accused Milind Ekbote, Milind Ekbote , Home Made Meal


  •