Wed, Nov 21, 2018 15:20होमपेज › Pune › कोरेगाव-भीमा प्रकरण : राहुल फटांगळेच्या संशयित मारेकऱ्यांचे फोटो प्रसिद्ध

राहुल फटांगळेच्या संशयित मारेकऱ्यांचे फोटो प्रसिद्ध

Published On: Jun 08 2018 12:32PM | Last Updated: Jun 08 2018 12:32PMपुणे : प्रतिनिधी
कोरेगाव-भीमा हिंसाचारात राहुल बाबाजी फटांगळे या तरुणाच्या मारेकरण्याचा शोध लागला असून, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने यातील तिघांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणातील अन्य फरार आरोपींचे शोधासाठी त्यांचे छायाचित्र प्रसिध्द करण्यात आले आहेत. 

1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे दोन गटात हिंसाचार झाला होता. त्यात राहुल फटांगळे या तरुणाचा अज्ञाताकडून खून करण्यात आला होता. दरम्यान याप्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाकडे दिला होता. त्यानुसार तपास सुरु होता. या गुन्हात सीआयडीने यापूर्वी तिघांना अटक केली. मारहाणीचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यात मारेकरी दिसत आहेत. त्यात आणखी काही जण असून, त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी या आरोपींचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहेत. तसेच याबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.