Sun, May 26, 2019 11:42होमपेज › Pune › प्रकाश आंबेडकरांकडून आज महाराष्‍ट्र बंदची हाक

प्रकाश आंबेडकरांकडून आज महाराष्‍ट्र बंदची हाक

Published On: Jan 02 2018 6:55PM | Last Updated: Jan 02 2018 8:51PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

भीमा कोरेगावप्रकरणाचे महाराष्ट्रभर पडसाद उमटले आहेत. अजूनही अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळीचे प्रकार सुरू असून या प्रकरणानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याबाबतची माहिती डॉ. आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या राज्यव्यापी संपात राज्यातील सर्व संघटनांनी सहभागी व्‍हावे असे आवाहनही आंबेडकर यांनी केले. तसेच राज्यभरात आज पुकारण्यात आलेला बंद आणि आंदोलन मागे घेण्यासही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. भीमा कोरेगावप्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. शिव प्रतिष्ठान आणि हिंदू एकता आघाडी यांनी ही दंगल घडवून आणली असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (१ जानेवारी) किरकोळ वादातून दोन गटांमध्ये दगडफेक आणि वादावादीचा प्रकार घडला होता.  त्याचे पर्यावसन गाड्यांची तोडफोड आणि दगडफेकीत झाले. भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला २०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने तेथे विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

संबंधित बातम्या

भीमा कोरेगावचे राज्यात पडसाद; कोठे काय घडले?

भीमा-कोरेगाव हे सरकारचे अपयश : पृथ्वीराज चव्हाण

भीमा कोरेगावप्रकरणी सामाजिक सलोखा राखावा : शरद पवार

फूट पाडणाऱ्यांचा डाव हाणून पाडा : अशोक चव्हाण

घटनेची चौकशी न्यायाधीशांमार्फत होणारः मुख्यमंत्री (Video)