Tue, Mar 26, 2019 23:55होमपेज › Pune › पुणे: पावसाची संततधार; भिडे पूल वाहतुकीसाठी बंद

पुणे: पावसाची संततधार; भिडे पूल वाहतुकीसाठी बंद

Published On: Aug 17 2018 11:24AM | Last Updated: Aug 17 2018 11:24AMपुणे: प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे खडकवासला धरणातील पाण्यासाठ्यात वाढ झाली आहे. काल मुठा नदीत विसर्ग वाढवल्याने नदीतील पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भिडे पुलावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे.

पावसाने मोठ्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. यामुळे धरणातील पाण्यात वाढ झाली. काल रात्रीपासून मुठा नदीत ९ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. विसर्ग वाढल्याने नदीच्या प्रवाहाचा वेग वाढला आहे. यामुळे नदीवरील भिडे पुलावर पाणी येण्याची शक्यता आहे. म्हणून वाहतुक विभागाने भिडे पुल बंद केला आहे.